नवी दिल्ली 30 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. वाइल्डलाइफमध्ये रस असणाऱ्यांनी अनेकदा पाहिलं असेल की शिकारी प्राणी कशाप्रकारे नेहमीच आपल्या शिकारीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच समोरच्या प्राण्यावर तुटून पडतात. हे प्राणी शिकारीसाठी चपळपणा आणि हुशारी या दोन्हीचा वापर करतात. विशेषतः सिंह आणि चित्ता यासारख्या मोठ्या प्राण्यांचा अंदाज तर पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video of Wild Animals) शेअर केले जातात. मात्र, तुम्ही कधी एखाद्या माकडाला शिकार करताना पाहिलंय का? सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक माकड बिबट्यावर हल्ला (Monkey Attacked on Leopard) करताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल. उड उड रे COW : आकाशात उडाल्या 10 गायी, पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का माकड म्हणजे नेहमी इकडून तिकडे उड्या मारणारा आणि मस्ती करणारा प्राणी अशी प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे. हा प्राणी केवळ इतर प्राण्यांनाच नाही तर माणसांनाही अक्षरशः मेटाकुटीला आणतो. मात्र, हा प्राणी अगदी भयानक प्राण्यांनाही पळवून मैदान सोडण्यास भाग पाडतो, यावर कदाचितच कोणाचा विश्वास बसेल. अतिशय हुशार आणि शिकारी बिबट्याही माकडासमोर टिकला नाही आणि आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Shocking Video) पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
‘जय श्री राम म्हणावंच लागेल’; भंगार विकणाऱ्या वृद्ध मुस्लिमाला तरुणांकडून धमकी हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर chekaphotosafaris नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक ही व्हिडिओ क्लिप एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरला असेल. लोकांचं म्हणणं आहे, की त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या बिबट्याला अशाप्रकारे माकडाला घाबरून पळताना पाहिलं आहे. बबून माकडाचे दात अतिशय लांब असतात. त्यामुळे, ही माकडं अगदी सहजपणे कोणत्याही चित्ता आणि बिबट्याला पळवून लावू शकतात.