JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - जंगलातील झाडात लपून फोटोग्राफर बनवत होता व्हिडीओ; इतक्यात बिबट्याची नजर पडली अन्...

VIDEO - जंगलातील झाडात लपून फोटोग्राफर बनवत होता व्हिडीओ; इतक्यात बिबट्याची नजर पडली अन्...

कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यावर बिबट्याने जे केलं ते पाहून थक्क व्हाल.

जाहिरात

कॅमेराकडे पाहताना बिबट्या (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जून :  जरा विचार करा, तुम्ही एखाद्या जंगलात गेलात. तिथं तुम्हाला एखादा खतरनाक प्राणी दिसला. त्या प्राण्याला पाहून तुम्ही घाबरलात पण तरी त्याला आपल्या कॅमेऱ्यात शूट करण्याचा मोहही तुम्हाला आवरला नाही. तुम्ही तुमचा कॅमेरा हातात घेतला आणि त्या प्राण्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागला. पण त्याच क्षणी त्या प्राण्याची नजर तुमच्या कॅमेऱ्यावर पडली. त्याने तुमच्याकडे पाहिलं… फक्त वाचूनच तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल ना? तुम्हाला घाम फुटला ना? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वाइल्डलाइफ पाहायला अनेकांना आवडते. पण हे वाइल्डलाइफ दाखवण्यासाठी स्वतः जंगलात जाऊन हे वाइल्डलाइफ शूट करणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी ते मृत्यूच्या दारात जाण्यासारखंच आहे. जंगलात जाऊन फोटोग्राफी करणं वाटतं तितकं सोपं नाही. एक छोटीशी चूक किंवा खतरनाक प्राण्याच्या तावडीत सापडलं तर मग काही खरंच नाही. असाच हा धडकी भरवणारा व्हिडीओ.

एक फोटोग्राफर जंगलात शूट करण्यासाठी गेला. तिथं त्याला एक बिबट्या दिसला आणि त्याने त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. इवलासा म्हणून शिकार केली, पण छोटाशा पक्षीही बिबट्यावर पडला भारी; कसं वाचवलं स्वतःला पाहा VIRAL VIDEO फोटोग्राफर एका झुडुपात लपून बसला होता आणि बिबट्याला कॅमेऱ्यात कैद करत होता. त्याच क्षणी बिबट्याची नजर त्या कॅमेऱ्यावर पडली. त्यानंतर पुढे काय घडलं ते तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा. व्हिडीओत पाहाल तर बिबट्या एका ठिकाणी शांत बसला आहे. तो आपले पंजे चाटत आहेत. कॅमेरा दिसताच तो एकटक कॅमेऱ्याकडे पाहतच राहतो. फोटोग्राफर कॅमेरा झूम करतो आणि बिबट्या अगदी जवळ येतो. त्याची ती नजर पाहूनच आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. VIDEO - जेव्हा आमनेसामने आले 2 शिकारी! बिबट्या-ब्लॅक पँथरमध्ये लढाई, कोण कुणावर ठरलं भारी? shaazjung नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने अमेझिंग म्हटलं आहे. तर एकाने बिबट्याने हल्ला न करता व्हिडीओ कसा बनवायला दिला?, असा सवालही केला आहे.

संबंधित बातम्या

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या