नवी दिल्ली 14 मे : बिबट्या हा जंगलातील भयंकर शिकारी आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत तो एखाद्या प्राण्याची शिकार करतो. सोशल मीडियावर बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ (Leopard Attacks on a Man) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका व्यक्तीवर अचानक हल्ला करताना दिसतो. यानंतर काय होतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तरुणाचा आगीसोबत खतरनाक स्टंट; तोंडाजवळ नेला जाळ अन्.., थरकाप उडवणारा VIDEO एक बिबट्या चुकून जंगलातून बाहेर पडून मानवी वस्तीत आल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो लोकांवर हल्ले करू लागतो. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका वस्तीत शिरताना दिसत आहे. यादरम्यान तो एका व्यक्तीवर हल्ला करतो. बिबट्या अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो, त्यामुळे सुरुवातीला त्याला सावरण्याची संधी मिळत नाही, परंतु लगेचच तो व्यक्ती सावध होतो. यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर तो बिबट्याच्या तावडीतून स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरतो.
बिबट्या जंगलातून बाहेर येऊन एका घरात घुसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाला पाहून तो त्याला आपलं लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करतो. बिबट्या माणसावर जीवघेणा हल्ला करतो. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हा व्यक्ती खूप घाबरतो. मात्र, तो हार मानत नाही. यानंतर तो बिबट्याचा सामना करतो. बापरे! चक्क चित्त्यालाच किस करायला गेली तरुणी आणि…; Shocking आहे Video चा शेवट तुम्हाला दिसेल की हा व्यक्ती काठी उचलतो आणि बिबट्याचा सामना करायला लागतो. यामुळे बिबट्या काही वेळ व्यक्तीची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, मात्र नंतर तिथून पळून जातो. हा व्यक्ती ज्या पद्धतीने बिबट्याचा धैर्याने सामना करतो, ते अत्यंत धाडसी कृत्य आहे. त्याचा हा कारनामा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. Animals_powers नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.