मुंबई, 10 जून: बातमीच्या सुरुवातीलाच तुम्हाला विचारलं की हे काय आहे तर साहजिकच तुम्ही सांगाल की हे एक सुकलेलं पान आहे. पण आम्ही तुम्हाला सांगितलं या सुकलेल्या पानाचं आता सुंदर फुलपाखरू (Leaf turned into butterfly) बनणार, तर साहजिकच तुम्हाला विश्वास नाही बसणार किंबहुना हसूच येईल. बरं मग तुम्ही स्वतःच स्वतःच्या डोळ्यांनी हा व्हिडीओ पाहा आणि मगच तुमची प्रतिक्रिया द्या. या सुकलेल्या पानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कोणत्या जादूपेक्षा कमी नाही आहे. कारण तुम्ही पाहता पाहता या पानाचं सुंदर फुलपाखरात रूपांतर होतं आणि हे पान फुलपाखरू बनून उडू लागतं, कसं ते या या व्हिडीओत पाहा.
व्हिडीओत पाहू शकता. जमिनीवर एक सुकलेलं पान पडलं आहे. एक व्यकी या पानाला हात लावतं, अचानक हे पान हलू लागतं. म्हणजे त्याच्यात जीव असावा तसं ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातं. पुन्हा ते जमिनीवर शांत पडून राहतं. ती व्यक्ती पुन्हा त्या पानाला हात लावते आणि काय पानाला चक्क पंखच फुटतात आणि ते उडू लागतं. करड्या रंगाच्या या पानावर रंगही दिसू लागतात. सुकलेल्या पानाचं रूपांतर चक्क सुंदर फुलपाखरात होतं. हे वाचा - शवासन करत होता मालक, छातीवर बसला कुत्रा आणि…; VIDEO पाहून तुम्हीही चक्रवाल तसं पाहायला गेलं तर हा व्हिडीओ म्हणजे एखादं मॅजिकच वाटेल. तशी ही मॅजिकच आहे पण ही हातचलाखी नाही तर हा नैसर्गिक चमत्कार आहे. निसर्गाची ही किमया आहे. तसं पानाचं रूपांतर फुलपाखरात होतं असं नाही. प्रत्यक्षातच हे पान नसून फुलपाखरूच आहे. ज्याचा एक भाग हा सुकलेल्या पानासारखा आहे तर दुसरा भाग हा रंगीत आहेत. हे वाचा - चमत्कार! बर्फाखाली दबलेला हा प्राणी 24 हजार वर्षांनंतरही सापडला जिवंत प्रत्येक पशू-पक्ष्याकडे आपल्या संरक्षासाठी, बचावासाठी एक विशेष क्षमता असते. जसं रंग बदलणारा सरडा, तसंच हे फुलपाखरू आहे. जे कुठे स्थिरावलेलं असताना पानासारखं होतं जेणेकरून कुणी त्याला सुकलेलं, निरुपयोगी पान समजून हात लावणार नाही.