JOIN US
मराठी बातम्या / Viral / महिला नागा साधूंचे हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल

महिला नागा साधूंचे हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल

नागा साधूंचे जीवन खूप रहस्यमय आहे, परंतु तुम्ही कधी महिला नागा साधूंबद्दल ऐकले आहे का? महिला नागा साधूंबद्दल काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 05 जानेवारी : प्रयागराजमध्ये लवकरच माघ मेळा सुरू होणार आहे. यादरम्यान केवळ भाविकच नाही तर अनेक मैल दूरवरुन काहीसाधू देखील स्नान करण्यासाठी येतात. यांपैकी बरेच साधू हे परदेशी असतात. कोणी आत्म्याला शांती मिळावी म्हणून या संगमात डुबकी मारतात तर कोणी आपली पापे धुण्यासाठी. कुंभमेळ्याचे आयोजन केवळ प्रयागराजमध्येच नाही तर हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथेही केलं जातं. सध्या कुंभमेळ्यात नागा साधू सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. लोकांना हे साधू इतरांपेक्षा वेगळे वाटतात. ज्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांना जास्त उत्सुक्ता असते. त्यात नागा स्त्रीयांबद्दल तर जास्तच कुतुहल वाटतं. हे कुठे राहातात, ते कुठून येतात? त्यांचं आयुष्य नक्की कसं असतं? हे ही पाहा : आधी शरीरिक संबंध, मग 51 वार… CCTV फुटेजमुळे उघडलं राज स्त्री नागा साधू किंवा संन्यासी हे तुम्हाला नेहमीच पिवळे-केशरी रंगाच्या कपड्यात दिसतात. खरंतर नागा साधू बनणं सोपं नाही यासाठी तुम्हा परीक्षा पास करावी लागते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मटा ही पदवी दिली जाते. कठोर तपश्चर्येनंतर त्या आखाड्याचे सर्व ऋषी-मुनी तिला आई म्हणतात. महिला नागा साधूंना नेहमी पिवळे-केशरी कपडे घालावे लागतात. नागा साधूंचे जीवन खूप रहस्यमय आहे, परंतु तुम्ही कधी महिला नागा साधूंबद्दल ऐकले आहे का? महिला नागा साधूंबद्दल काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महिला नागा साधूंना घर आणि गृहस्थीची चिंता नसते. त्यांचे जीवन खूप कठीण आहे. महिला नागा साधूंच्या जीवनाबद्दल कोणालाच माहिती नाही. कुंभात सामील झाल्यानंतर सर्वजण गायब होतात आणि ते केवळ कुंभमेळ्याच्या वेळीच सार्वजनिकपणे दिसतात. नागा साधू बनण्यासाठी त्याची परीक्षा दीर्घकाळ चालते. नागा साधू किंवा संन्यासी होण्यासाठी 10 ते 15 वर्षे दररोज कठोर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते. नागा साधू बनण्यासाठी महिलांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि तपश्चर्येतून त्यांना आपल्या गुरूला हे पटवून द्यावे लागते की ते नागा साधू बनण्यास सक्षम आहे. आखाड्यातील ऋषी-मुनी नागा साधू बनणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची माहिती ठेवतात. नागा साधू बनण्यासाठी त्यांना जीवंत असताना स्वतःचे पिंडदान करावे लागते. पिंडदानानंतर मुंडन करून पवित्र नदीत स्नान करावे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया कुंभमेळ्यादरम्यानच गुप्तपणे केली जाते. नागा तपस्वी महिला दिवसभर भक्तीमध्ये तल्लीन राहून सकाळ संध्याकाळ परमेश्वराचा नामजप करत असतात. सिंहस्थ आणि कुंभमध्ये या महिला नागा साधू शाही स्नान करतात. दुपारच्या जेवणानंतर ते भगवान शिवाचा जप करतात. आखाड्यात महिला साधूंचा खूप आदर केला जातो. त्यांचा कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीशी काहीही संबंध नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल. सर्वसामान्यांसाठी ते सत्तेचे प्रतीक आहेत. साधू आणि संत महिला नागांना दीक्षा देतात.

आता पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. गेल्या वेळी 2013 मध्ये महाकुंभ आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी पुन्हा एकदा ऋषी-महात्मांचा कळप पाहायला मिळणार आहे. तथापि, या काळात नागा साधू देखील दिसणार आहेत, मात्र त्यांना भेटणे सोपं काम नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या