किचन सिंकमध्ये कात्रीची कमाल (फोटो - सिम्पली मराठी युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 23 जून : पैसे बचत करण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल. पण पैसे बचतीचा आणखी एक सोपा असा मार्ग. किचन सिंकमध्ये कात्री टाकून तुम्ही पैशाची बचत करू शकता. आता किचन सिंक, कात्री आणि पैसा यांचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल. पण एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेला हा जुगाड. ज्यात तिने किचन सिंकमध्ये कात्रीचा वापर करून पैशांची बचत करण्याचा मार्ग दाखवला आहे. आता ते कसं, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते पाहुयात.
व्हिडीओत गृहिणीने दाखवल्यानुसार तिने एक कात्री घेतली आहे आणि ती सिंकमधील जाळीत टाकली आहे. जाळीतील प्रत्येक छेदात कात्री टाकून ती जाळीत अडकलेली घाण कात्रीत अडकवून बाहेर काढत आहे. तुम्हाला हा उपाय क्षुल्लक वाटेल, याचा पैसे बचतीशी कसा काय संबंध असू शकतो, असा विचार तुम्ही कराल. Kitchen Jugaad Video - दूध गरम करताना त्यात साबण जरूर टाका; आहे जबरदस्त फायदा गृहिणीने याच व्हिडीओत याचं स्पष्टीकरण दिलं आहे. कितीही उपाय केले तरी किचन सिंकमध्ये कचरा अडकतोच. तसं किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी ड्रेन क्लिनर पावडर मिळतं. पण ते काही आपण दररोज वापरत नाही. महिन्यातून एकदाच वापरतो. शिवाय ते खूप महागही असतं. त्यामुळे तिथं पैसा खर्च होतो. पण जर तुम्ही यापद्धतीने किचन सिंक स्वच्छ केलं तर तुम्हाला ड्रेन क्लिनरची जास्त गरज पडणार नाही आणि पैशांचीही बचत होईल. महिन्यातून एकदा ड्रेन क्लिनर पावडर वापरा. पण दोन दिवसाने एकदा कात्रीचा हा उपाय करा. जेणेकरून सिंक कमी खराब होईल आणि ब्लॉक होणार नाही. Kitchen Jugaad Video - साबण-स्क्रबची गरजच नाही, फक्त न्यूजपेपरने अशी घासा भांडी सिम्पली मराठी युट्यूब चॅनेलवर हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला नक्की सांगा.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)