फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली, 26 जून : दूध खराब होऊ नये म्हणून आपण ते गरम करतो आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही वेळा कितीही काळजी घेतली, काही केलं तरी कधीतरी दूध खराब होतंच. पण आता तुमच्याकडील दूध कधीच खराब होणार नाही. एका गृहिणीने दूध खराब होण्यासाठी एक जबरदस्त टिप्स दिली आहे. या किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दूध खराब झाला, दूध फाटलं, दुधाला विचित्र वास येतो अशी तक्रार कित्येक गृहिणींची असते. पण काही गृहिणींनी त्यावर उपाय शोधला आहे. तिने तो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तुमच्याही खूप फायद्याचा ठरेल.
दूध खराब होऊ नये यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. दुधात असा असं काही मिसळायाचं आहे की त्यामुळे दूध खराब होणार नाही. आता ते काय आहे ते व्हिडिओमध्ये पाहूया. Kitchen Jugaad Video - दूध गरम करताना त्यात साबण जरूर टाका; आहे जबरदस्त फायदा व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता महिलेने एका भांड्यात दूध घेतलं आहे. तिने सांगितल्यानुसार यात तुम्हाला तेल टाकायचं आहे. आता कोणतं तेल, तर मोहरीचं तेल. एका छोट्या चमच्यात अगदी थोडं तेल घ्या आणि ते दुधात मिक्स करा. तेल दुधात पूर्ण मिसळेपर्यंत मिक्स करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दुधाचा रंग थोडा बदललेलाही दिसेल. पांढरं दूध किंचित पिवळं झालं आहे. Kitchen Jugaad Video - दागिने चपातीच्या पिठात ठेवा; परिणाम असा की पाहतच राहाल SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)