JOIN US
मराठी बातम्या / Viral / चप्पलखाली लपला कोब्रा, उचलताच काढला फना आणि...पाहा Shocking Video

चप्पलखाली लपला कोब्रा, उचलताच काढला फना आणि...पाहा Shocking Video

पावसानं देशभरात हजेरी लावलीय. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मात्र पाऊस जेवढा सुखावणारा तेवढाच धोकादायकही आहे. पावसाळ्यात अनेक किडे, प्राणी आसऱ्यासाठी अडगळीची जागा शोधतात.

जाहिरात

चप्पलखाली लपला कोब्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जुलै : पावसानं देशभरात हजेरी लावलीय. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मात्र पाऊस जेवढा सुखावणारा तेवढाच धोकादायकही आहे. पावसाळ्यात अनेक किडे, प्राणी आसऱ्यासाठी अडगळीची जागा शोधतात. मग ते घरातही कधी कुठे लपतील सांगता येत नाही. पावसाळ्यात अशा अनेक घटना समोर येत असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय जिथे चपलेखाली भयानक किंग कोब्रा निघाला. चपलेखाली किंग कोब्रा लपून बसल्याचा व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओ पाहूनच धडकी भरेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चप्पलखाली एक किंग कोब्रा लपून बसला होता. व्यक्तीने चप्पल उचलताच त्याने फना वर काढला. हे दृश्य धडकी भरवणारं आहे. पावसाळ्यात असं प्राण्यांचं अडगळीच्या ठिकाणी बसण्यातं प्रमाण वाढतं.

संबंधित बातम्या

@animal_lover_wagad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ गराळा घालत असतात. यापूर्वीही घरात साप, नाग, कोब्रा, अजगर निघाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हे धोकादायक प्राणी आपलं ठाण मांडून बसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या