JOIN US
मराठी बातम्या / Viral / King Cobra ने दुसऱ्या कोब्राला केलं फस्त, Viral होतोय हा भीतीदायक Photo

King Cobra ने दुसऱ्या कोब्राला केलं फस्त, Viral होतोय हा भीतीदायक Photo

एक किंग कोब्रा दुसऱ्या कोब्राला खात (king cobra eating another cobra) असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेवढं हे वाचायला भयंकर वाटत आहे, तेवढाच हा फोटो देखील भीतीदायक आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै: तुम्ही जर सोशल मीडियावर (Viral on Social Media) नेहमी सक्रीय असाल, तर निसर्गासंबंधित काही भयंकर गोष्टींचे व्हिडीओ किंवा फोटो तुमच्या नजरेत आले असतील. असे काही व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे निसर्गाचं अद्भुत रुप दाखवत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एक किंग कोब्रा दुसऱ्या कोब्राला खात (king cobra eating another cobra) आहे. जेवढं हे वाचायला भयंकर वाटत आहे, तेवढाच हा फोटो देखील भीतीदायक आहे. यामध्ये किंग कोब्राचे भेदक डोळे हृदयाचा ठोका चुकवणारे आहेत. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘Ophiophagus hannah, स्पेक्टेल्ड कोब्राला खाताना किंग कोब्रा.’

संबंधित बातम्या

त्यांनी पुढे अशी माहिती दिली आहे की, किंग कोब्राचे शास्त्रीय नाव Ophiophagus hannah असं आहे. Ophiophagus हा शब्द ग्रीकमधून पुढे आला आहे. त्याचा अर्थ सर्प खाणारा असा होतो. hannah चा अर्थ ग्रीक पौराणिक कथांनुसार, झाडावर वास्तव्य असणाऱ्या Nymphs असा होतो. त्यामुळे किंग कोब्राचे हे नाव अतिशय सार्थ आहे. हा एकमेव साप आहे जो घरटी बांधतो. हे वाचा- बापाकडून लेकीच्या सासरच्यांना तगडी भेट; एक टन मासे, 250 किलो मिठाई अन् 10 बकऱ्या दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. 2000 च्या जवळपास लाइक्स या फोटोला मिळाले आहेत. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांनी यावरच आश्चर्य व्यक्त केलं आहे की एखादा साप दुसऱ्या सापाला खाऊ शकतो, याबाबत माहितीच नव्हती. एका युजरने कासवान यांनी दिलेल्या माहितीबाबत आभार व्यक्त केले आहेत. एका युजरने किंग कोब्राच्या डोळ्यांबाबत कमेंट केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या