JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्त्यात बसला होता भलामोठा किंग कोब्रा; तरुणाने गोळी झाडताच नागाने घेतला भयानक बदला..Shocking Video

रस्त्यात बसला होता भलामोठा किंग कोब्रा; तरुणाने गोळी झाडताच नागाने घेतला भयानक बदला..Shocking Video

कच्च्या वाटेवर कोब्रा साप फणा पसरवत उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या समोर दोन तरुण गाडीतून उतरत उभे आहेत. त्यापैकी एकाच्या हातात रायफल आहे

जाहिरात

किंग कोब्राचा हल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 एप्रिल : जगात लाखो जीव आढळतात. त्यातील काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना पाहून माणूस भीतीने थरथर कापू लागतो. यापैकी एक प्राणी म्हणजे साप. या रांगणाऱ्या प्राण्याच्या अनेक प्रजाती आहेत. यातील एक प्रजाती कोब्रा सापाची आहे, जी सर्व सापांमध्ये अत्यंत विषारी मानली जाते. वाटेत एखादा कोब्रा साप दिसला, तरी कोणालाही घाम फुटणं स्वाभाविकच आहे.

कोब्रा हा अतिशय विषारी साप आहे आणि तो चावल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो. मात्र तरीही काही लोक न घाबरता या सापाला अगदी सहज पकडतात किंवा त्याच्यासोबत खेळताना दिसतात. एका व्यक्तीने असंच काहीसं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लगेचच आपल्या कर्माचं फळ मिळालं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

संबंधित बातम्या

कच्च्या वाटेवर कोब्रा साप फणा पसरवत उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या समोर दोन तरुण गाडीतून उतरत उभे आहेत. त्यापैकी एकाच्या हातात रायफल आहे. त्या शस्त्राच्या साहाय्याने तो दोनदा सापावर गोळीबार करतो पण सापाला गोळी लागत नाही. यामुळे संतापलेल्या कोब्राने दोन्ही तरुणांवर झटपट हल्ला केला, त्यानंतर दोन्ही तरुण घाबरून ओरडताना दिसतात. इथेच हा व्हिडिओ संपतो. भडकलेल्या वाघाची पर्यटकांच्या गाडीवर झेप, घाबरलेल्या महिला ओरडायला लागल्या अन् मग.., घटनेचा VIDEO हा व्हिडिओ एकूण 10 सेकंदांचा आहे. Instant Karma नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे ते समजू शकलं नाही, पण तो १६ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. यात दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- कोब्रासोबत लढताना बंदुकीचा काही उपयोग नाही!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या