कांगारुचा पर्यटकावर हल्ला
नवी दिल्ली, 17 जून : प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यामुळे त्यांना जवळून पाहण्यासाठी लोक प्राणी संग्रहालयात, जंगल सफारीवर जातात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कधी पर्यटकांच्या काही गोष्टींमुळे प्राणी चिडतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळे कोणता प्राणी कशामुळे चिडेल, संतापेल काही सांगता येत नाही. असाच एका चिडलेल्या प्राण्याचा व्हिडीओ समोर आलाय. प्राणीसंग्रहालयातील एक कांगारु थेट पर्यटकलाच भिडला. पर्यटकावर तो हल्ला करु लागला. कांगारु आणि पर्यटकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला आणि पुरुष प्राणीसंग्रहालयातील फेरफटका मारत आहेत. तेवढ्यात महिलेच्या मागे एक कांगारु येतं. ते महिलेच्या मागे मागे चालत आहे. पुरुष त्याला महिलेच्या पाठिमागे जाण्यापासून थांबवतो. ज्यामुळे कांगारु चिडतो आणि त्याच्याच मागे लागतो. कांगारु त्या व्यक्तीवर हल्ला करु लागतो. व्यक्ती त्याला थांबण्याचा प्रयत्न करतो मात्र कांगारु अजूनच सरसावून त्याच्या अंगावर धावून जात आहे. खरंतर हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. कांगारूंशी लढणारी व्यक्ती अमेरिकेतील पर्यटक आहे. खोडकर कांगारू आणि अमेरिकन पर्यटकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
@ZeusKingOfTwitt नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदांच्या व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहे. लोक अनेक निरनिराळ्या कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, जंगल सफारीवर किंवा प्राणी संग्रहालयात गेल्यावर असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. प्राण्यांचे असे व्हिडीओ काही वेळातच इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात.