JOIN US
मराठी बातम्या / Viral / विमान उड्डान घेणार तेवढ्यात व्यक्ती ओरडू लागली, 'दार उघडा मला उतरायचंय...'; काय आहे प्रकरण?

विमान उड्डान घेणार तेवढ्यात व्यक्ती ओरडू लागली, 'दार उघडा मला उतरायचंय...'; काय आहे प्रकरण?

विमानानं प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचं दिसत आहे. प्रत्येक वेळी कहीतरी नवीन घटना विमानात घडत आहे. ज्यामुळे इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो.

जाहिरात

विमान उड्डान घेणार तेवढ्यात व्यक्ती ओरडू लागली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जुलै : विमानानं प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचं दिसत आहे. प्रत्येक वेळी कहीतरी नवीन घटना विमानात घडत आहे. ज्यामुळे इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. नुकतीच विमानातील आणखी एक घटना समोर आलीये ज्यामुळे विमानात खळबळ उडाली. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. जेव्हा विमान उड्डान करणारच होतं तेव्हा अचानक एक प्रवासी जागेवरुन उठून ओरडू लागला. तो त्याच्या शेजारील प्रवाशातृला एवढा त्रासला की मोठ्याने ओरडत दार उघडा म्हणत होता. दार उघडा मला जाऊद्या असं म्हणत तो दरवाजाच्या दिशेने धाव घेत होता. तेवढ्यातच इतर प्रवशांनी पुढे येत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.

विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि टीकटॉकवर शेअर केला. @DrLoupis नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 44 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

दरम्यान, अशी अनेक प्रकरणे आत्तापर्यंत समोर आली आहेत. विमानात भांडण, मारामारी, लघवी, सीटवरुन वाद, अचानक विमानाचा दरवाजा उघडला, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या