JOIN US
मराठी बातम्या / Viral / पुणेरी पाट्यांना टक्कर; 'जे मूर्ख नाहीत त्यांना नोकऱ्या!' पिझ्झा शॉपसमोरील बोर्ड पाहून बेरोजगार हैराण!

पुणेरी पाट्यांना टक्कर; 'जे मूर्ख नाहीत त्यांना नोकऱ्या!' पिझ्झा शॉपसमोरील बोर्ड पाहून बेरोजगार हैराण!

आजच्या जगात नोकरी मिळणं खूप कठिण झालं आहे. खूप शिक्षण घेऊन देखील असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे चांगली नोकरी नाही. नोकरी मिळवण्यासाठी लोक खूप मेहनतदेखील घेतात.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : आजच्या जगात नोकरी मिळणं खूप कठिण झालं आहे. खूप शिक्षण घेऊन देखील असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे चांगली नोकरी नाही. नोकरी मिळवण्यासाठी लोक खूप मेहनतदेखील घेतात. मात्र काहींना नोकरी मिळवण्यासाठी खूप समस्यांना तोंड लागते. लोकांना शिकलेले, पदवीधर असलेले लोक नोकरीसाठी हवे असतात तोच दुसरीकडे मुर्ख नसलेल्या लोकांसाठी नोकरीची ऑफर समोर आली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरंच ही नोकरीची जाहिरात एका दुकानासमोर लावण्यात आली. सध्या याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. NBC-16 न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, साउथवेस्ट कोलंबसमध्ये असलेल्या Santino’s Pizzeria ने आपल्या रेस्टॉरंटसमोर एक विचित्र नोकरीची जाहिरात लावली. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बॉसने नोकरीची जाहिरात दिली आहे जी बर्‍याच लोकांना विचित्र वाटत आहे. तोच दुसरीकडे अनेकांना मजेदार देखील वाटत आहे. हेही वाचा -  Viral Video : रोल, कॅमेरा, अॅक्शन…; ‘लो बजेट’ चित्रपटाचा ‘तो’ सीन व्हायरल रेस्टॉरंटच्या बाहेर पोस्टर लावलेल्या याच जाहिरातीचा फोटो एकाने ट्विटरवर शेअर केला आहे. जाहिरातीवर इंग्रजीत लिहिले आहे - “Now Hiring Non-Stupid People”. कष्ट करूनही कर्मचारी काम करतो, त्यांना मूर्ख म्हणणे आणि अशा जाहिराती देऊन नवीन कर्मचारी भरती करणे हे अपमानास्पद आहे. यावरून अनेकांनी रेस्टॉरंटला ट्रोल केले. एका ग्राहकाला ही जाहिरात इतकी वाईट वाटली की त्याने सुमारे 10 रुपयांत 10 पिझ्झा ऑर्डर केले. यानंतर त्याला गरिबांमध्ये अन्न वाटप करावे लागले.

ही जाहिरात व्हायरल होताच शॉपच्या मालकाची मुलगी जेडेन ड्युनिगन म्हणाली की, मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता, फक्त जाहिरात फनी करायची होती जेणेकरून जास्तीत जास्त लोक अर्ज करू शकतील. जुने कर्मचारी कामाकडे लक्ष न देता दिवसभर फोनवर व्यस्त होते आणि त्यांची वृत्तीही चांगली नसल्यामुळे त्यांनी अशी जाहिरात दिल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून या जाहिराती लावण्यात आल्याने त्यांना भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढल्याचे मालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अशा विचित्र, मजेशीर आणि हटके जाहिराती सोशल मीडियावर अनेकांचं सहज लक्ष वेधून घेतात. यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्यांदेखील वाढते. या जाहिरातीमुळेही Santino’s Pizzeria या रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या