नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी: आपल्या देशात चित्रपटप्रेमींची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे जुगाडू लोकांची संख्याही बरीच आहे. कोण कोणत्या वस्तूचा वापर कसा करेल, याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडfओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पण, त्या व्यक्तीचा जुगाड पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. ‘झी न्यूज हिंदी’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.
फिल्म मेकिंग ही एक महागडी प्रक्रिया मानली जाते. त्यासाठी लोकेशन, कॅमेरा, इक्विपमेंट्स यासह अनेक गोष्टींची आवश्यकता असते. चित्रपट बनवण्यासाठी पैसाही खूप खर्च करावा लागतो. लोकांना चित्रपट खूप आवडतात आणि अनेकांना या क्षेत्रात हात आजमावायचा आहे, पण त्यासाठी पुरेशी साधनं नाहीत. सध्याच्या काळात लोक मोबाईल फोनचा वापर करून जुगाड करतात. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
When your movie budget is $20 pic.twitter.com/OdBmW4I9VL
— The Figen (@TheFigen_) February 18, 2023
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे बालपण आठवेल. यात लहान मुलं जुगाडच्या माध्यमातून शूटिंग करताना दिसत आहेत. जर तुम्हाला खरोखरच चित्रपट बनवायचा असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असं या व्हिडिओतून दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचा एक गट चित्रपट शूट करण्यासाठी कमी बजेट इक्विपमेंट्सचा वापर करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये, मुलं त्यांची फिल्म शूट करण्यासाठी फोन वापरत आहेत. व्हिडिओची सुरुवात मुलांनी एक सीन शूट करण्याचा प्रयत्न करताना होते. ज्यामध्ये एक व्यक्ती चालताना दिसत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे फोन धरणाऱ्या मुलाने योग्य शॉट घ्यावा, यासाठी दुसरा मुलगा त्याचे पाय धरून त्याला हळू हळू ओढताना दिसतो. यात सर्वात वर चौथा माणूस आहे, जो शॉट दिग्दर्शित करतो, पण 'अॅक्शन' आणि 'कट' म्हणण्यासाठी फिल्मी क्लॅपऐवजी तो चप्पल वापरतोय. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी द फिगेन नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला होता. "जेव्हा तुमच्या चित्रपटाचे बजेट 20 डॉलर असते," असे कॅप्शन व्हिडिओला दिले होते. हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून ट्विटरवर 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी हसण्याच्या इमोजीदेखील कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Movie shooting, Social media viral, Video viral, Viral