पाण्यात घुसून जग्वारने मगरीवर केला हल्ला
नवी दिल्ली, 29 जुलै : जंगलात एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्या हल्ल्यात वाचणं खूपच कठिण आहे. जंगलातील शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. आजकाल तर या धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडेही पहायला मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक धोकादायक प्राण्यांच्या शिकरीचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच जग्वारचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये मगरीची शिकार करतोय. जग्वारनं संधी साधत पाण्यातील मगरीची सफाईने शिकार केली. या हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही फोटोग्राफर बोटीमध्ये प्रवास करत आहेत. त्यांच्या हातात कॅमेरा असून ते जंगलातील दृश्य कॅमेऱ्याद कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेवढ्यात अचानकपणे जंगलातून एक जग्वार येतो आणि पाण्याकडे पाहतो. काहीच वेळात त्याला पाण्यामध्ये मगर दिसते. मग काय तो झपकन मगरीवर हल्ला करतो. काही वेळा पाण्यामध्ये दोघंची जबरदस्त भांडणं चालतात. शेवटी, जग्वार मगरीला तोंडानं पकडून पाण्यातून बाहेर काढतो.
हा व्हिडीओ पाहून अनेकजण जग्वारच्या धाडसाचं कौतुर करत आहेत. @LeContempIateur नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आल आहे. मिनिट 29 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे, शिकारीचे, हल्ल्याचे अनेक व्हिडीओ समोर येतात. एकपेक्षा एक भयानक आणि धोकादायक शिकारी जंगलात असतात. ते कधी हल्ला करतील काही सांगू शकत नाही.