JOIN US
मराठी बातम्या / Viral / भाजपचा कट्टर चाहता पाहिला का? कमळासारखी केली Hair Style, पाहा PHOTO

भाजपचा कट्टर चाहता पाहिला का? कमळासारखी केली Hair Style, पाहा PHOTO

भाजपच्या कट्टर चाहत्याने अनोखी हेअर स्टाईल केली आहे.

जाहिरात

हेअर स्टाईल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शाश्वत सिंह, प्रतिनिधी झांसी, 27 मे : भारतातील स्टार्स आणि राजकीय पक्षांसोबतच त्यांचे चाहतेही चर्चेत आहेत. बरेच चाहते असे आहेत की त्यांची क्रेझ पाहून लोक त्यांना जबरा फॅन्स म्हणू लागतात. आपली आवड सिद्ध करण्यासाठी ते काहीही करतात. उत्तरप्रदेशच्या झाशीमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक व्यक्ती आहे जो भारतीय जनता पक्षाचा कट्टर चाहता आहे. निवडणुकीपूर्वी त्याने शपथ घेतली होती की, पक्ष जिंकला तर पक्षाच्या चिन्हाप्रमाणे केस कापेन. बालकिशन कुशवाहा असे या व्यक्तीचे नाव आहे. तो झांसी येथील रहिवासी आहे. बालकिशन कुशवाह यांनी भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळासारखे केस कापले आहेत. यासोबतच डोक्यावर भाजप असे लिहिले आहे.

बालकिशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान शपथ घेतली होती की, बिहारीलाल आर्य महापौरपदाची शपथ घेतील तेव्हा मी भाजपच्या निवडणूक चिन्हाप्रमाणे केस कापेन. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशीच शपथ घेतली होती. ते स्वतःला भाजपचा समर्पित कार्यकर्ता असल्याचे सांगतात. भाजपचा कट्टर चाहता

भाजपचा कट्टर चाहता

दर 5 दिवसांनी केस कापतात - बालकिशन कुशवाह हे व्यवसायाने कलाकार आहेत. त्यांनी अनेक व्यासपीठांवर कार्यक्रम सादर केले आहेत. अशाप्रकारे केस कापण्यासाठी त्यांनी वैयक्तिक न्हाव्याचीही नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे केस ठेवण्यासाठी ते दर 5 दिवसांनी केस कापतात. येत्या निवडणुकीतही अशीच शपथ घेणार असून भाजपला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या