JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा आंबा की मासा? Video पाहून सगळेच पडले बुचकाळ्यात

हा आंबा की मासा? Video पाहून सगळेच पडले बुचकाळ्यात

उन्हाळ्यात गरमीमुळे लोक हैराण झालेले पहायला मिळतात. या गरमीच्या दिवसात एका गोष्टीची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात ती गोष्ट म्हणजे आंबा. आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असतो.

जाहिरात

आंबा आहे की मासा?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जून : उन्हाळ्यात गरमीमुळे लोक हैराण झालेले पहायला मिळतात. या गरमीच्या दिवसात एका गोष्टीची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात ती गोष्ट म्हणजे आंबा. आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असतो. यामुळे गरमींमध्ये थोडा आराम मिळतो. आंब्याच्या अनेक निरनिराळ्या जातींविषयीही तुम्हाला माहित असेल. मात्र तुम्ही कधी आंब्यासारखा मासा पाहिलाय का? हे वाचून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही मात्र गोष्ट खरी असून आंब्यासारख्या माश्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओने सर्वांनाच थक्क केलंय. सध्या समोर आलेला माश्याचा व्हिडीओ पाहून अनेकजण गोंधळात पडले आहे. तो एकदम आंब्यासारखा दिसत आहे. सुरुवातीला पाहिल्यावर मासा आंबा वाटतोय मात्र निरघून पाहिल्यावर समजेल की तो आंब्यासारखा दिसणारा मासा आहे. हा मासा खूपच गोंडस दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने हातात आंबा पकडल्याचं दिसत आहे. नंतर निरघून पाहिल्यावर समजतं की, तो आंबा नसून एक मासा आहे. त्याला डोळे, दातही दिसत आहे. शेवटी व्यक्ती त्या माश्याला पाण्यात सोडते तेव्हा तो पोहतानाही दिसत आहे.

संबंधित बातम्या

@kinzamalik336 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या अनेकांनाा आश्चर्यचकित करत आहे. थोड्याच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटही येताना दिसतायेत. दरम्यान, हा मासा इरोथ्रॉन मेलेग्रीस आहे. याला सामान्यतः गिनीफॉल पफर असेही म्हणतात. त्याचा रंग पिकलेल्या आंब्यासारखा असतो. पाणी गिळल्यामुळे त्याचे शरीर फुगते. त्यामुळे त्याचे शरीर गुबगुबीत होते. अशा स्थितीत तो हलला की मग तो गादीसारखा थरथरतो. हा मासा जितके जास्त पाणी पितो तितका तो फुगतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या