प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 07 जून : वेगवेगळ्या प्रकारची दारु बाजारात उपलब्ध आहे. लोक आपल्या आवडी प्रमाणे दारु घेतात. शिवाय प्रत्येक दारु पिण्याची एक विशिष्ट पद्धत असते, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दारु वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासमध्ये घेतल्या जातात. दारुमुळे शरीराचं नुकसान होतं असं म्हणतात. पण असं असलं तरी देखील वाईन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तसेच हे पिण्याची पद्धत देखील इतर अल्कोहोल पेक्षा वेगळी आहे. वाईन पिण्याचा ग्लासही वेगळा असतो. वाईनचा ग्लास खूप खोलगट आणि लांब असतो, ज्याला खाली एक काठी किंवा दांडी असते. यामध्ये काचेच्या खोलगट ग्लासाच्या तळाशी एक काठी असते, त्या काठीखाली एक खोलगट थाळी सारखा भाग असतो, ज्याच्या सह्यावर ग्लास उभा गेला जातो. तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक वेळा लोकांना वाईन पिताना पाहिलं असेल किंवा तुम्हीही कुठेतरी वाईन प्यायली असेल, तर ती वेगळ्या प्रकारच्या ग्लासमध्ये प्यायली जाते. तेव्हा लोक ग्लासाच्या वरच्या भागाला थेट हात न लावता, त्याच्या दांडीला पकडून दारु पित असल्याचे तुम्ही पिहिले असेल. पण मग प्रश्न असा की अशावेगळ्या प्रकारे ग्लासचं डिझाइन बनवण्याचं कारण काय? वास्तविक, वाईन पिण्याची एक खास पद्धत आहे. ती विशिष्ट तापमानातच प्यायली जाते. अशा स्थितीत यासाठी काचही स्वतंत्रपणे तयार करण्यात आली आहे. असे म्हणतात की वाइनने भरलेल्या ग्लासाला हाताने स्पर्श केला तर हाताच्या उष्णतेमुळे त्याचे तापमान बदलते आणि ते लवकर गरम होते. म्हणूनच ते पिण्यासाठी एक वेगळी काचेची दांडी बनवली जाते, ज्यामध्ये तळापर्यंत एक काठी आहे. अशा परिस्थितीत वाईन ग्लासाला हाताने धरण्याऐवजी या काठीने धरून प्यायले जाते.