इन्स्टंट बिअर (फोटो: Twitter/@taka_piana)
जर्मनी, 14 जुलै : ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही कॉफी प्यायली असेल. या ठिकाणी तुम्हाला पावडर कॉफी प्यायला मिळते जी दूध किंवा पाण्यात मिसळल्यानंतर लगेच पिता शकते. त्याचप्रमाणे तुम्ही इन्स्टंट सूपही प्यायला आहे. जे पावडर पाण्यात मिसळून तयार होतं. आता कॉफी आणि सूपसारखीच लगेच बनवून पिता येईल अशी इन्स्टंट बिअर ही बाजारात आली आहे. मद्य प्रेमींसाठी ही गूडन्यूज आहे. जसं तुम्ही इन्स्टंट कॉफी बनवता किंवा प्रोटीन शेक बनवतो त्याच पद्धतीने ही बिअऱ बनवयची आहे. एक ग्लास पाण्यात दोन चमचे पावडर टाकायची आणि ढवळायचं की झाली तुमची बिअर तयार. या बिअरची चव अगदी सामान्य बिअरसारखीच आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जर्मनीतील Neuzeller Klosterbräu कंपनीने ही इन्स्टंट बिअर पावडर तयार केली आहे. ही कंपनी या उद्योगातील 500 वर्षे जुनी कंपनी आहे. भन्नाट नोकरी! बस्सं, फक्त दारू प्यायचं आणि फिरायचं; कुठे आहे पटापट क्लिक करून पाहा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही पावडर कमी संसाधनं वापरते, त्यांचा वाहतूक खर्चही खूप कमी आहे, ही बनवायला अगदी सोपी आहे, याचा पर्यावरणावरही खूप परिणाम होतो, असं कंपनीने सांगितलं आहे. या शोधामुळे बिअर एक्स्पोर्ट्स कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. बिअर पिणार्यांना त्यांची ताजी लिक्विड बिअर आवडते. अशा परिस्थितीत जर्मनीतील बिअरप्रेमींसाठी हा अनुभव सुरुवातीला फारच विचित्र असू शकतो. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, त्यांना माहित आहे की लोकांना अशी बिअर पिणं सुरुवातीला आवडणार नाही. मात्र त्यांची ही बिअर हा व्यवसाय पूर्णपणे बदलण्याचं काम करत आहे. हे बाजारात नवीन उत्पादन नाही, परंतु बाजारपेठ बदलण्याचे काम करत आहे. बेवड्यांसाठी स्पेशल Beer Omelette! वाचून तोंडाला पाणी सुटलं असेल, पण VIDEO पाहून सांगा खाण्याची आहे का तयारी? चांगली गोष्ट म्हणजे पावडर बीअर अल्कोहोल मुक्त आहे.
ज्या कंपनीने ही बिअर तयार केली कंपनी लवकरच त्याचे अल्कोहोलिक व्हर्जन देखील बनवणार आहे.