JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नात लोक हॅलीकॉप्टर भाड्याने घेतात, पण यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात माहितीय?

लग्नात लोक हॅलीकॉप्टर भाड्याने घेतात, पण यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात माहितीय?

भाड्याने हॅलिकॉप्टर घेण्यासाठी किती पैसे लागत असतील? किंवा भारतात लग्नासाठी बुक केलेल्या हेलिकॉप्टरची किंमत किती असेल? असा प्रश्न लोकांना नेहमीच पडतो.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मे : प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी वेगळं आणि हटके करायचं असतं, जे प्रत्येकाच्या लक्षात राहिल. त्यासाठी काही लोक तर अगदी पाण्यासारखा पैसा देखील खर्च करायला तयार असतात. ज्यामध्ये काही लोक तर अगदी हॅलिकॉप्टरमधून वधू-वर लग्नात ऐन्ट्री करत असताना तुम्ही पाहिलं असेल. अशा वेळी अनेकांच्या मनात विचार येतो की पैसा भरपूर खर्च केला असणार. पण असं असलं तरी देखील असा प्रश्न लोकांच्या मनात नक्कीच येतो की, भाड्याने हॅलिकॉप्टर घेण्यासाठी किती पैसे लागत असतील? किंवा भारतात लग्नासाठी बुक केलेल्या हेलिकॉप्टरची किंमत किती असेल? डॉक्टरांची एक चुक आणि वडिलांनी डोळ्यासमोर पाहिला आपल्या नवजात बाळाचा मृत्यू खरं तर, सध्या भारतात लग्नांचा हंगाम सुरू आहे. अलीकडेच, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये वधू आणि वर हेलिकॉप्टरमध्ये बसून लग्नाच्या मंडपात पोहोचले आहेत. त्याचवेळी हेलिकॉप्टरची किंमत किती असेल, असा प्रश्न सोशल मीडियाच्या वापरकर्त्याने उपस्थित केला. चला तर मग जाणून घेऊया भारतात लग्नासाठी किती बुक केले जाते. एका मीडिया रिपोर्टनुसार यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. पण बुकिंग कंपन्या स्वतःसाठी काही किमान अटीही ठेवतात. म्हणजे दोन तासांपेक्षा कमी बुकिंग होणार नाही आणि अंतरानुसार पैसे घेतील. यासोबतच ठराविक कालावधीनंतर भाडे अधिक भरावे लागणार असल्याचेही ठरले आहे. नेल कटरमध्ये का असतात दोन लहान सुऱ्या? 99 टक्के लोकांना माहिती नाही याचा योग्य वापर यासाठी कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करावे लागेल. अशी सुविधा देणार्‍या अनेक एजन्सी आहेत. सीट, अंतर आणि तासानुसार हेलिकॉप्टरची किंमत ठरवली जाते. आजकाल वापरात असलेले हेलिकॉप्टर पायलटसह तीन सीट्स असतात. एका अहवालानुसार दोन तासांच्या बुकिंगसाठी दोन ते अडीच लाखांचा खर्च येतो. यानंतर जर हेलिकॉप्टरला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल, तर त्याचे शुल्क प्रति तास 50-60 हजार रुपयांपर्यंत वाढते. दुसरीकडे, दुस-या रिपोर्टनुसार, एका एजन्सीने आपल्या नियमात असेही लिहिले आहे की, हेलिकॉप्टर एखाद्या दुर्गम गावात नेले तर त्याची किंमत वेगळी असेल आणि जर लग्नाचा कार्यक्रम शहराजवळ होणार असेल तर त्याचा खर्च कमी घेतला जाईल. एकूणच यासाठी एखादा निश्चित दर किंवा भाडं किती असेल हे सांगता येणं कठीण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या