स्टंटचा व्हायरल व्हिडीओ
इंदूर : सोशल मीडियावर काही लोक प्रसिद्धीसाठी आणि काही व्ह्यूजसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. तरुण मंडळी तर असं काही करुन बसतात की मग ते आपल्या जीवाचीही परवा करत नाहीत. त्यांचे स्टंटचे हे व्हिडीओ अनेकदा जीवघेणे ठरतात, तर अनेक लोक यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कारच्या स्टंटचा आहे. ज्यामध्ये एक लक्झरी कारसोबत रस्त्याच्या मधोमध स्टंट करताना पाहायला मिळत आहे. रस्त्यावर लोकांची गर्दी असताना देखील कारमधील तरुणांनी धोकादायक प्रकार केला. या मध्ये त्यांनी स्वत:सोबतच इतरांचे प्राण देखील धोक्यात टाकले. जेव्हा माकडाने स्वत:लाच पाहिले आरशात, पुढे काय घडलं? पाहा मजेदार व्हिडीओ त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी त्या गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार इंदूरमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. या तरुणाने स्टंट किंवा रील बनवण्याच्या वेडातून हा स्टंट केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि तपासाच्या सूचना दिल्या.
वाहतूक पोलिसांनी त्या आलिशान कारमध्ये दिसलेल्या कारच्या नंबरच्या आधारे वाहन आणि चालकाचा शोध घेतला. पोलिसांनी कार जप्त करून गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता आरटीओला पत्र लिहून चालकाचा परवाना रद्द करतील.
या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट्स देखील करत आहेत.