व्हायरल
नवी दिल्ली, 12 एप्रिल : प्रेम ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असल्याचं म्हटलं जातं. प्रेम मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. प्रेमात अनेकजण आधंळेही झालेले पहायला मिळतात. आपण विचारही करु शकत नाही एवढ्या मर्यादा लोक ओलांडत असतात. आत्तापर्यंत प्रेमात लोकांनी भरपूर काही केलेल्या घटना समोर आल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडलीये. प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी जे केलं ते वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 41 वर्षीय मोसेस गिब्सन नावाची व्यक्ती सध्या चर्चेत आहे. मोशेने त्याच्याविषयी थक्क करणारा खुलासा केला आहे. मोशेने सांगितलं की, तो 5 फूट 5 इंच आहे. कमी उंचीमुळे त्याला लाज वाटायची. त्याची गर्लफ्रेंडची त्याला यामुळे सोडून गेली. तो स्वतःचा तिरस्कार करु लागला आणि त्याचा आत्मविश्वास संपला. उंच दिसण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले. त्याने उंच दिसावे म्हणून पायात कपडे घातले. इंटरनेटवरुन शोधून उंची वाढण्यासाठी गोळ्या घेतल्या. पण या सर्व उपचारांचा त्याला काहीच फायदा झाला नाही.
शेवटी मोसेने त्याच्या पायांची उंची वाढवून घेण्याचा निर्णय घेतला. हे खूप वेदनादायक होतं मात्र हाच एक उपाय शिल्लक राहिला होता. सर्जरीसाठी पैसे अपुरे पडत असल्यामुळे त्याने रात्रंदिवस काम केलं. दिवसा एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करायचा आणि रात्री उबर कार चालवायचा. यामुळे तीन वर्षांत $75,000 जमा झाले. 2016 मध्ये पहिल्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे उंची 3 इंचांनी वाढली. म्हणजेच आता त्याची उंची 5 फूट 8 इंच झाली आहे. यामुळे मोशेला खूप आनंद झाला. त्याला अजून उंची हवी होती तर या वर्षी मार्चमध्ये दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यावर आणखी 98,000 खर्च झाला. आता त्याची उंची 2 इंचांनी वाढेल अशी आशा आहे. हेही वाचा - मध्यरात्री चालकाशिवाय सुरु झाली रिक्षा, Video धडकी भरवणारा ही सर्जरी खूप अवघड आणि वेदनादायक असल्याचं डॉक्टर म्हणाले. मोसेने सांगितलं की, त्याला आता मुलींशी बोलायला संकोच वाटत नाही. त्याची गर्लफ्रेंड त्याच्याकडे परत आलीये. तो आता शॉर्ट्स घालू शकतो आणि खूप सारे फोटो काढू शकतो.