पतीविरोधात पत्नीची अजब तक्रार
मुंबई, 21 एप्रिल : नवरा-बायकोचं भांडण तसं काही नवं नाही. प्रत्येक पती-पत्नींमध्ये वाद होता. याची कारणंही वेगवेगळी असतात. अगदी क्षुल्लक कारणावरूनही कपल भांडतात. गिफ्ट न देणं, बर्थडे, लग्नाचा वाढदिवस अशीही भांडणाची कारणं आहेत. काही महिलांना तर आपल्या पतीने आपल्यासाठी एखादं छानसं गाणं म्हणावं अशी अपेक्षा असते. त्यावरूनही महिला भांडतात. पण एक महिला मात्र याच कारणावरून थेट पोलिसात पोहोचली आहे. नवरा आपल्यासाठी गाणं गात नाही म्हणून बायकोने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने नवऱ्याविरोधात पोलिसांकडे ही अजब तक्रार दिली. आपल्या पतीने आपल्यासाठी कधीच गाणं गायलं नाही अशी आपली अजब व्यथा तिलेन पोलिसांकडे मांडली. तिचा नवराही तिच्यामागोमाग तिथं आला. संतप्त पत्नीला शांत करण्याचा, तिची समजूत काढण्याचा तो प्रयत्न करू लागला. अखेर पोलीस ठाण्यात जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पतीने पत्नीसाठी पोलीस ठाण्यात जे केलं ते पाहून पोलीसही अवाक झाले. त्यांनीही टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. पती-पत्नीमधील भांडण, राग, रुसवा आणि प्रेमाचा हा व्हिडीओ. सर्वांच्या काळजाला भिडला आहे. नवऱ्याने दिलं नाही एकही गिफ्ट, बायको सुडाने पेटली; पतीच्या वाढदिवसालाच… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-बायको पोलीस ठाण्यात दिसत आहे. पतीने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तो तिच्याकडे प्रेमाने पाहतो आहे. पत्नी मात्र रुसलेली आहे. ती त्याच्याकडे पाहायलाच तयार नाही. थोडा वेळ सर्वकाही शांत होतं. अन अचानक गाणं ऐकू ेयेतं. महिलेचा नवरा तिच्यासाठी गाणं गातो. पतीच्या तोंडून आपल्यासाठी गाणं ऐकल्यानंतर पत्नीही भावुक होते. ती पतीच्या मिठीत जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. नवऱ्याने गायलेलं गाणं ऐकून तिला रडूच कोसळतं. स्वतःचा नवरा मृत्यूच्या दारात, बायकोने वाचवलं परपुरुषाला; कारण वाचून कौतुक कराल @arvindchotia ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कधी कोणतं गाणं गायलं आहे का? किंवा तुम्ही तुमच्या रुसलेल्या जोडीदाराची समजूत कशी काढता? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.