JOIN US
मराठी बातम्या / Viral / तीन पत्नींसोबत राहते `ही` व्यक्ती; नोकरी करून पत्नीच चालवतात घर, नेमका काय आहे हा प्रकार

तीन पत्नींसोबत राहते `ही` व्यक्ती; नोकरी करून पत्नीच चालवतात घर, नेमका काय आहे हा प्रकार

एक व्यक्ती त्याच्या अनोख्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

जाहिरात

Credit: The Davis Family / Instagram

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : आजकाल प्रेमविवाह, लिव्ह इन रिलेशनशिप, विवाहबाह्य संबंध किंवा एकापेक्षा जास्त विवाह करणं यांसारख्या गोष्टी पाहायला मिळतात. सध्या एक व्यक्ती त्याच्या खास रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. या व्यक्तीने एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याच्या जीवनाशी निगडीत काही खास गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे ही व्यक्ती त्याच्या तीन पत्नींसोबत राहते. ही व्यक्ती कोणतंही काम करत नाही. त्याच्या तिन्ही पत्नी नोकरी करतात. असं असतानाही या चौघांमधलं नातं अतिशय मजबूत आहे. या व्यक्तीने त्याच्या रिलेशनशिपविषयी नेमकं काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊया. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एक व्यक्ती त्याच्या अनोख्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. ही व्यक्ती एकाच घरात तीन पत्नींसोबत राहते. अलीकडेच या व्यक्तीने एका टीव्ही शोमध्ये तीन बायकांसोबतच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. 39 वर्षांचा निक डेव्हिस नुकताच `टीएलसी`च्या `सीकिंग सिस्टर वाइफ` नावाच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याच्या एप्रिल, जेनिफर आणि डॅनियल या तीन बायकांसह सहभागी झाला होता. निकच्या तीनही पत्नी फुलटाइम जॉब करतात. या वेळी निक म्हणाला, `मी रात्री माझ्या तिन्ही पत्नींसोबत झोपतो. मला वाटेल तेव्हा मी रोमान्स करतो. मी माझ्या तिन्ही बायकांची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. एप्रिल ही माझी पहिली पत्नी आहे. विद्यापीठात आमची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघं गेल्या 15 वर्षांपासून एकत्र आहोत.` हेही वाचा -  लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक निक आणि एप्रिलच्या आयुष्यात सुमारे दहा वर्षांपूर्वी जेनिफरचा प्रवेश झाला. एप्रिल आणि जेनिफरची ओळख जॉबदरम्यान झाली. एप्रिल ज्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत होती, त्याच आयटी कंपनीत जेनिफर देखील मॅनेजर होती. `जेनिफरला भेटल्यानंतर ती निकला नक्की आवडेल असं मला वाटलं. त्या वेळी जेनिफरचं वय 19 वर्षं होतं,` असं एप्रिलनं सांगितलं. त्यानंतर निक, एप्रिल आणि जेनिफरच्या आयुष्यात 22 वर्षांच्या डॅनियलचा प्रवेश झाला. डॅनियलने निकसोबत लग्न केलं. डॅनियलशी विवाहबद्ध होण्यापूर्वी जेनिफरने गेल्या वर्षी जूनमध्ये वेरा नावाच्या मुलीला जन्म दिला होता. टीव्ही शोमध्ये बोलताना निक म्हणाला, `मी बुद्धिबळातल्या राजासारखा आहे. त्यामुळे मी फारशा हालचाली करत नाही. माझ्या बायका राणीप्रमाणे आहेत. त्यामुळे त्याच आमचं घर चालवतात.` निकने टीव्ही शोमध्ये त्याच्या खासगी जीवनाविषयी खुलासा केल्यानंतर त्याची एप्रिल, जेनिफर डॅनियलसोबत असलेली अनोखी रिलेशनशिप सध्या जोरदार चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या