JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: भुकलेलं हरण थेट साप खायला निघालं, जबड्यात पकडताच काय झालं बघा

Viral Video: भुकलेलं हरण थेट साप खायला निघालं, जबड्यात पकडताच काय झालं बघा

शाकाहारी समजल्या जाणाऱ्या हरणाला भूक लागल्यावर त्याने सापाला कच्चं चावून खाल्लं. हे पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

जाहिरात

हरणाने चक्क साप खाल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जून : हरणांना सहसा गवत आणि लहान झाडं, फळं-फुलं आणि काजू खायला आवडतात. ते पूर्णपणे शाकाहारी मानले जातात. पण ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. शाकाहारी समजल्या जाणाऱ्या हरणाला भूक लागल्यावर त्याने सापाला कच्चं चावून खाल्लं. हे पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण त्यांनी या रूपात हरीण पाहिलं नव्हतं. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक हरिण गवताप्रमाणे चावून साप गिळताना दिसत आहे. सुशांत नंदा यांने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘कॅमेरे आपल्याला निसर्गाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करत आहेत. होय, शाकाहारी प्राणी कधीकधी साप खातात’. 21 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक हरिण सुमारे 5 फूट लांब सापाला अगदी सहज चावताना दिसत आहे. वन्य प्राण्यांमध्ये हरीण, हत्ती आणि झेब्रा शाकाहारी प्राणी मानले जातात, जे सहसा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून असतात. मात्र संधी मिळाल्यास हरण मांसही खातात.

संबंधित बातम्या

वैज्ञानिक संशोधन आणि अनेक कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओने याची पुष्टी केली आहे, की हरीण कधीकधी लहान पक्षी खातात. ते पक्ष्यांच्या घरट्यांमधली अंडी खातानाही आढळून आले आहेत. हरीण मृत मासे यांसारख्या मृत प्राण्यांचे मांस खातात. तसंच ते ससे, खारूताई आणि बेडूकदेखील खाऊ शकतात. मात्र एवढ्या मोठ्या सापाला हरण पहिल्यांदाच गिळताना दिसत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हरणांची पचनसंस्था मांसामध्ये आढळणारी प्रथिने पचवण्यासाठी पुरेशी नसते, त्यामुळे हरण यापासून दूर राहतात. त्यांना शिकार करायलाही आवडत नाही. Viral Video: हरणाची शिकार करत होता चित्ता; शेवटी स्वतःचाच जीव वाचवत पळाला, काय घडलं पाहा हा व्हिडिओ पाहता-पाहता अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. वापरकर्ते हरणाला मांस खाताना पाहून आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्यांनी कधीही हरणाला मांस खाताना पाहिलं नाही. एका युजरने लिहिलं की, हरणांना साप खाणारा प्राणी म्हणून ओळखलं जात नाही, पण याचा अर्थ असा नाही की ते असं कधीच करत नाहीत. हरणाला खूप भूक लागली असेल तर तो साप खाऊ शकतो. हरण सहसा वनस्पती खाण्यास प्राधान्य देतात. परंतु आवश्यकता असल्यास इतर गोष्टीदेखील खातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या