प्रतीकात्मक फोटो - Canva
वॉशिंग्टन, 10 जून : आतापर्यंत कुत्रा, मांजर चावल्याने जीवघेणं इन्फेक्शन झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे. पण एका माणसाला माणसाने चावल्याने इन्फेक्शन झालं आहे. इन्फेक्शनही इतकं भयानक ही या व्यक्तीचा जीव जाण्याची वेळ आली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडातील ही धक्कायक घटना आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉनी एडम्स असं या व्यक्तीचं नाव. फेब्रुवारीमध्ये तो एका फॅमिली पार्टीला गेला होता. तिथं त्याचं नातेवाईकाशी भांडण झालं. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यावेळी डॉनीचा नातेवाईक त्याला चावला. डॉनीला जखम झाली. या घटनेनंतर डॉनीने रुग्णालयात जाऊन टिटॅनसचे इंजेक्शन घेतलं आणि सोबत अँटीबायोटिक्स घेतले. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत बाळाला अवघ्या 4 मिनिटांत पुन्हा जिवंत केलं; पाहा LIVE VIDEO तिसऱ्या दिवशी त्याच्या पायाला सूज येऊ लागली आणि संसर्ग पसरला. त्याला चालताही येत नव्हते. पायात वेदना आणि सूज दोन्ही होती. जेव्हा त्यानं पाहिलं की त्याचा संसर्ग कमी होत नाही, तेव्हा तो रुग्णालयात गेला जिथे त्याला आपत्कालीन वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. त्याच्या शरीरात ‘नेक्रोटायझिंग फॅसिआयटिस’ नावाचं मांस खाणारं बॅक्टेरिया असल्याचं डॉक्टरांना तपासात आढळून आलं. नातेवाईक चावल्याने हा बॅक्टेरिया अॅडमच्या शरीरात शिरल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्या व्यक्तीचे दात अॅडमच्या त्वचेच्या आत घुसले होते. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, कुत्र्याच्या चाव्यापेक्षा मानवाचा चावा अधिक घातक असतो. कारण यामुळे विविध प्रकारचे जीवाणू वाढतात. मूल नको म्हणता म्हणता जाईल तुमचाच जीव; वयाच्या पंचविशीतच तरुणीची भयानक अवस्था डॉक्टरांनी अॅडमच्या मांडीवर शस्त्रक्रिया करून संक्रमित ऊती काढून टाकल्यात. तो योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आला, त्यामुळे त्याचे प्राण वाचले नाहीतर त्याला सेप्टिक इन्फेक्शन होऊन एकतर त्याचा पाय कापावा लागला असता किंवा त्याचा मृत्यू झाला असता, असं डॉक्टर म्हणाले.