JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News: हे वाचून हॉटेल रूममधील बाथरूममध्ये टूथब्रश ठेवण्याचा विचारही करणार नाही; मॅनेजरने केला धक्कादायक खुलासा

Viral News: हे वाचून हॉटेल रूममधील बाथरूममध्ये टूथब्रश ठेवण्याचा विचारही करणार नाही; मॅनेजरने केला धक्कादायक खुलासा

मेलिसाने नुकताच टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने हॉटेलमध्ये राहताना बाथरूममध्ये टूथब्रश का सोडू नये याची माहिती दिली आहे.

जाहिरात

हॉटेल रूममधील बाथरूममध्ये ठेवू नका टूथब्रश (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 जुलै : जेव्हा लोक दुसऱ्या शहरात फिरायला जातात तेव्हा ते तिथे हॉटेल बुक करतात. या हॉटेलमधील रूममध्येच ते काही दिवस मुक्काम करतात, शहरात भरपूर फिरतात आणि मजा करतात. हॉटेलमध्ये मुक्काम करताना लोक तिथल्या रूमला स्वतःची खोली समजू लागतात. ते रूम आणि बाथरूममधील आपल्या वस्तू तशाच ठेवतात. टूथब्रशदेखील अशीच एक गोष्ट आहे, जी लोक बाथरूमच्या सिंकजवळ किंवा स्टँडमध्ये ठेवतात. जोपर्यंत ते हॉटेलमध्ये राहतो तोपर्यंत तो ब्रश त्याच स्टँडमध्ये तसाच पडून राहतो. पण हे चुकूनही करू नये. यामागं एक विचित्र कारण आहे, ज्याची माहिती खुद्द एका हॉटेल मॅनेजरने दिली आहे. डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, मेलिसा नावाची महिला याआधी हॉटेल मॅनेजर होती. आता ती सोशल मीडियावर @melly_creations_ नावाच्या अकाऊंटवरुन लोकांना प्रवासाच्या टिप्स आणि सूचना देते. इन्स्टाग्रामवर तिला 600 लोक फॉलो करतात पण टिकटॉकवर तिचे 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्टनुसार, मेलिसाने नुकताच टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने हॉटेलमध्ये राहताना बाथरूममध्ये टूथब्रश का सोडू नये याची माहिती दिली आहे.

मेलिसाने सांगितलं की, अनेकवेळा लोक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागतात आणि आपला राग त्यांच्यावर काढतात. हॉटेलचं नाव खराब होऊ नये, म्हणून कर्मचारी त्यावेळेस गेस्टला काहीही न बोलता ते सगळं सहन करतात, पण नंतर ते या गेस्टच्या सामानाशी छेडछाड करून त्याचा बदला घेतात. गेस्ट हॉटेलमधून बाहेर पडल्यावर रूममध्ये सफाई कर्मचारी येतात आणि खोल्या स्वच्छ करतात. अशा स्थितीत गेस्टने आपले टूथब्रश बाथरूममध्ये सोडले असतील, तर त्यांचा राग काढण्यासाठी हे कर्मचारी सिंक आणि बाथरूममधील अनेक घाणेरड्या गोष्टी ब्रशने स्वच्छ करतात. मेलिसा म्हणाली, की जेव्हा ती मॅनेजर होती तेव्हा तिने अधूनमधून स्टाफचे लोक असे वागल्याचं ऐकलं होतं. मात्र, मेलिसाने आजपर्यंत असं काहीही केलेलं नाही आणि जर कोणी तिच्यासमोर असं कृत्य करताना पकडलं गेलं असतं तर तिने त्याला नक्कीच काढून टाकलं असतं, असं ती म्हणाली. मात्र तिने लोकांना सुचवलं की जेव्हा ते हॉटेलच्या खोलीत टूथब्रश वापरतात तेव्हा तो वापरल्यानंतर परत बॅगेत ठेवा. याचं कारण अत्यंत किळसवाणं असलं तरी, प्रत्येकच हॉटेलमध्ये असं घडतं असं नाही. मात्र लोकांनी स्वतःची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. मेलिसा तिच्या इन्स्टाग्रामवर अनेकांना असे खास सल्ले देत असते. टिकटॉकवरही लोक तिला फॉलो करतात. यापूर्वी ती हॉटेलची मॅनेजर होती, त्यामुळे तिला हॉटेलशी संबंधित अनेक गोष्टी माहीत आहेत. एका व्हिडिओमध्ये तिने आपलं आवडतं हॉटेल कोणतं आहे, हे सांगितलं होतं. ती अनेकदा ट्रिपला जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या