JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : घोड्यासोबत नको ते कृत्य करणं भोवलं; प्राण्याने अशी लाथ मारली की थेट उडूनच पडला

Viral Video : घोड्यासोबत नको ते कृत्य करणं भोवलं; प्राण्याने अशी लाथ मारली की थेट उडूनच पडला

जेव्हा घोडा त्याच्या ताब्यात येत नाही तेव्हा हा व्यक्ती घोड्याला लाथ मारतो. यानंतर घोडा कुठे शांत राहणार होता?

जाहिरात

घोड्याने शिकवला धडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 जून : घोड्यावर ताबा ठेवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. यासाठी माणसांबरोबरच घोड्यांनाही विशेष प्रशिक्षण दिलं जातं. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये घोड्यावर ताबा मिळवताना काहीतरी दुर्घटना घडते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घोडा एका माणसावर हल्ला करतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने यावर कमेंट केल्या आहेत. Viral Video : कोब्रा आणि मुंगसाचं जोरदार भांडण, रागावलेला साप बाळाच्या पाळण्यावर चढला आणि… हा व्हिडिओ 17 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये एक माणूस घोड्याची दोरी पकडून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. जेव्हा घोडा त्याच्या ताब्यात येत नाही तेव्हा हा व्यक्ती घोड्याला लाथ मारतो. यानंतर घोडा कुठे शांत राहणार होता? घोड्यानेही त्या माणसाला अशा प्रकारे लाथ मारली की तो दूर जाऊन पडला.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लाल हेल्मेट घातलेल्या या व्यक्तीला घोड्यावर स्वार व्हायचं होतं. पण तो अयशस्वी झाल्यावर त्याने घोड्याला लाथ मारली. यानंतर त्या घोड्यानेही त्याला लगेच उत्तर दिलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की घोड्याच्या हल्ल्यात या व्यक्तीला दुखापतही झाली. घोड्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्तीने घोड्यावर स्वार झाला होता, मात्र घोड्याने त्याला खाली पाडलं होतं. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स त्यावर सतत कमेंट करत आहेत. या व्हिडिओबाबत एका युजरने लिहिलं की, ‘he deserved it’. तर दुसऱ्या यूजरने ‘किक फॉर ए किक’ असं लिहिलं. घोड्याच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या