तरुणाचा धक्कादायक स्टंट
नवी दिल्ली, 03 जुलै : आजकाल सोशल मीडियावर नवनव्या गोष्टी ट्रेंड होतात. त्यामुळे रोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असलेल्या पहायला मिळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडीओ पहायला मिळतात. लोक कधी कुठे काय स्टंट करतील याविषयी काही अंदाज बांधू शकत नाही. मजेशीर ते धोकादायक असे स्टंट इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून येतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. अनेक लोक प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतात. मात्र बऱ्याचदा हा स्टंट त्यांच्याच अंगलट येतो आणि त्यांना दुखापत होते तर अनेकांची जीवही जाते. सध्या समोर आलेला व्हिडीओमध्ये एका तरुणानेने चक्क घराच्या उंच छतावरुन झाडावर उडी घेतली. त्यानंतर जे धक्कादायक घडलं ते पाहून अंगावर काटा येईल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती घराच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारताना दिसत आहे. चष्मा घातलेला हा व्यक्ती घराच्या वरच्या मजल्यावरून झाडावर उडी मारतो. त्यानंतर तो झाडाच्या फांद्याशी आदळत जमिनीवर कोसळतो. यादरम्यान ती व्यक्ती लोखंडी कुंपणावरही पडल्याने कुंपण तुटले. मात्र, खाली पडल्यानंतर त्यांची प्रकृती किती गंभीर झाली असेल हे व्हिडीओ पाहूनच अंदाज लावता येईल.
@FAFO_TV नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 8 सेकंदांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहे. लोक अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एकापेक्षा एक भयानक स्टंट पहायला मिळतात. हृदयाचा ठोका चुकवणारे स्टंट अनेकदा समोर आलेत. असे व्हिडीओ काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल होतात.