JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking Video! 2 तुकडे झाले तरी साप जिवंत, धडावेगळ्या झालेल्या तोंडाने स्वतःचंच शरीर खाल्लं

Shocking Video! 2 तुकडे झाले तरी साप जिवंत, धडावेगळ्या झालेल्या तोंडाने स्वतःचंच शरीर खाल्लं

एका सापाच्या शरीराच्या दोन तुकड्यांमध्ये जुंपल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

सापाचा स्वतःवरच हल्ला (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जून : कोणताही जीव ज्याचं डोकं धडावेगळं झालं की त्याचं जिवंत राहणं अशक्य. पण काही जीव याला अपवाद आहेत. त्यापैकीच एक म्हणजे साप . धडावेगळं शीर झाल्यानंतर साप जिंवत राहिल्याची किंवा मृत साप जिवंत झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहताच सर्वांना धक्का बसला आहे. सापाचं डोकं धडावेगळं झालं तरी तो जिवंत होताच. पण त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे सापाच्या तुटलेल्या तोंडाने स्वतःच्या शरीरावरच हल्ला केला. सापाचं तुटलेलं तोंड आपलं तुटलेलं शरीर खाण्याचा प्रयत्न करू लागलं. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हायरल व्हिडीओत तुम्ही एक साप पाहू शकता. सापाचं तोंड नाही आहे, त्याचा तोंडाकडील भाग रक्तबंबाळ झाला आहे. पण डोकं तुटलं तरी साप जिवंत होता. तो हलताना दिसला. तिथं बाजूलाच त्याचं तुटलेलं तोंड पडलं होतं. जसं सापाचं शरीर त्या तोंडाजवळ गेलं तसं त्या तोंडाने त्याला धरलं आणि चावू लागलं. सापाच्या तोंडाने सापाच्या शरीराचा चावा घेतल्यानंतर सापाचं शरीर तडफडू लागलं. जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागलं. तो, ती आणि साप! आयुष्यात कधीच पाहिली नसेल अशी अनोखी LOVE STORY व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला दोन साप एकमेकांशी भांडल्यासारखे वाटतात पण व्हिडीओ नीट पाहिला तर एकाच सापाच्या शरीराचे दोन तुकडे एकमेकांशी भांडत आहेत. आतापर्यंत तुम्ही सापाला दुसऱ्या प्राण्यांची शिकार करताना, माणसांना दंश करताना पाहिलं असेल. पण साप स्वतःच्याच जीवावर उठल्याचं हे भयानक दृश्य कदाचित कधीच पाहिलं नसेल. ज्यात साप स्वतःच स्वतःवर हल्ला करताना दिसला आहे. बापरे! हा VIDEO पाहिल्यानंतर टॉयलेटमध्ये जायलाच घाबरत आहेत लोक; असं काय आहे यात तुम्हीच पाहा @OTerrifying नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या