शीर नसलेला माणूस (फोटो - रेडिट)
नवी दिल्ली, 15 जुलै : काही दिवसांपूर्वी बसमधील एका अशा महिला प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, जिच्या धडावर डोकं नव्हतं. ही महिला भूत असल्याचा दावा केला जात होता. आता पुन्हा असाच एक फोटो समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती बसमधून प्रवास करते आहे. बसच्या सीटवर बसलेल्या या व्यक्तीच्या धडावर डोकं नाही आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता एक काळ्या रंगाची जॅकेट घातलेली ही व्यक्ती बसच्या सीटवर विंडोच्या बाजूला बसली आहे. बसच्या विंडोची काचही काळी आहे. व्यक्तीने आपले दोन्ही हात जॅकेटच्या आत घातले आहेत. व्यक्तीच्या शरीराचा कोणताच भाग दिसत नाही. फक्त कॉलरपर्यंतचा भाग दिसतो आहे. पण त्यावर डोकं नाही. OMG! डॉक्टरांनी केला महादेवासारखा ‘चमत्कार’; मुलाचं धडावेगळं झालेलं डोकं पुन्हा जोडलं आता असं फोटो पाहिला तर कुणालाही धक्का बसणारच. हा भूत वगैरे तर नाही ना, असं तुम्हालाही वाटलं असेल. पण या व्हायरल फोटोचं सत्य मात्र काही वेगळंच आहे. ते सत्य तुम्हाला समजलं तर तुम्हाला धक्का बसेल. किंबहुना तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. सोशल मीडिया रेडिटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटो पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. फोटो शेअर करताना या व्यक्तीने हुडी घातल्याचं सांगण्यात आलं आहे. हुडीने त्याने आपलं डोकं झाकलं आहे. ऑप्टिकल इल्युझनसारखा हा फोटो आहे. आता या व्यक्तीचं नेमकं डोकं कुठं आहे ते तुम्हाला दिसलं का? रेस्टोरंटमधील 5 लोकांपैकी एक आहे महिलेचा खूनी, 10 सेकंदात शोधून काढू शकता? युझर्सने यावर दिलेल्या प्रतिक्रियानुसार कॉलरसारखी दिसणारी ती पट्टी तुम्हाला दिसते का? ती प्रत्यक्षात त्याच्या हुडची डावी बाजू आहे. तिचे डोके उजवीकडे झुकलेले आहे आणि तिच्या डोक्याचा वरचा भाग काचेच्या दिशेने आहे, त्यामुळे तुम्हाला या कोनातून फक्त हुडची डावी बाजू दिसते. व्यक्तीचं डोकं हुडीत आहे आणि खूप मागे झुकलं आहे.
Just a guy wearing a hoodie by u/zaferemre in confusing_perspective
आता तुम्हाला या व्यक्तीचं डोकं दिसलं असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.