प्रतीकात्मक फोटो - Canva
लखनऊ, 16 जून : कुणाला चार हात, कुणाला चार पाय, कुणाला दोन तोंड, कुणी एकमेकांना चिकटलेलं अशी एक ना दोन विचित्र बाळां ची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण आता एक असं विचित्र बाळ जन्माला आलं आहे, ज्याला पाहून त्याच्या पालकांसह डॉक्टरांनाही घाम फुटला आहे. उत्तर प्रदेशतील हे बाळ चर्चेत आलं आहे. फतेहगंज पश्चिममध्ये राहणाऱ्या दाम्पत्याचं हे बाळ. राजेंद्रनगरमधील खासगी रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला. बाळ जन्माला येताच त्याचं रंग-रूप पाहून डॉक्टरही शॉक झाले. बाळाचा रंग पांढरा होता. त्याच्या डोळ्यांच्या पापण्या उलट्या होत्या. त्याची त्वचा बऱ्याच ठिकाणी फाटलेली होती. धक्कादायक म्हणजे त्याच्या तोंडात वरील भागाकडील दातही आले होते. नवजात बाळाला दात नसतात. जसजशी बाळाची वाढ होते, तसतसे त्याला दात येऊ लागतात. पण या बाळाला जन्मापासूनच दात होते. डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत बाळाला अवघ्या 4 मिनिटांत पुन्हा जिवंत केलं; पाहा LIVE VIDEO असं बाळ पाहून डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचारीही घाबरले. असं बाळ का जन्माला आलं, त्या बाळाला नेमकं काय झालं आहे? हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या स्किनचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. त्याची स्किन बायोप्सी आणि केरिया टाइमिन तपासणी केली. त्यावेळी त्याला दुर्मिळ आजार असल्याचं निदान झालं. त्याला हार्लेक्विन इक्शिसोसिसु होता. हा दुर्मिळ असा आनुवंशिक त्वचा विकार आहे. अशा विकारासह जन्माला येणाऱ्या बाळाला हार्लेक्विन बेबी म्हणतात. शरीरात प्रोटिन आणि म्युकस मेंबेरेन नसल्याने बाळाची अशी अवस्था होते. अशा स्थितीत जन्मणाऱ्या बाळांची त्वचा कठोर असते. त्याच्या त्वचेचा रंग बदलतो. कित्येकदा बाळाचा गर्भातच मृत्यू होतो. या बाळाचाही जन्माआधी आईच्या गर्भातच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 4 हात, 4 पाय, 2 हृदय आणि…., जन्माला आलं अनोखं बाळ, डॉक्टरांनाही झालं आश्चर्य आज तक च्या वृत्तानुसार डॉक्टरांच्या मते, हार्लेक्विनच बाळाचा जन्म बरेली आणि देशात काही वर्षांपूर्वीही झाला होतं. त्या बाळाचा जीव वाचला की नाही हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.