जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 4 हात, 4 पाय, 2 हृदय आणि...., जन्माला आलं अनोखं बाळ, डॉक्टरांनाही झालं आश्चर्य

4 हात, 4 पाय, 2 हृदय आणि...., जन्माला आलं अनोखं बाळ, डॉक्टरांनाही झालं आश्चर्य

नवजात बाळ

नवजात बाळ

प्रिया पहिल्यांदा गरोदर होती. मात्र, 9 महिने पूर्ण होऊनही प्रसूती न झाल्यामुळे तिचे नातेवाईक चिंतेत होते.

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

विशाल कुमार, प्रतिनिधी छपरा, 14 जून : एका महिलेने 4 हात आणि 4 पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. यानंतर या घटनेची एकच चर्चा होत आहे. बिहारच्या सारण शहरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये ही घटना घडली. काल रात्री या चिमुरडीचा जन्म झाला होता. मात्र, जन्मानंतर अवघ्या 20 मिनिटांतच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली. प्रिया देवी या महिलेला काल रात्री छपरा येथील श्याम चक येथील खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. येथे तिने एका मुलीला जन्म दिला. या मुलीला 4 हात आणि 4 पाय होते. जन्मानंतर तिला पाहिलेले डॉक्टरही थक्क झाले. या मुलीला सामान्य बाळापेक्षा जास्त अवयव होते. तिला चार कान, चार पाय, चार हात दिसत होते. वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात दोन हृदय आणि दोन पाठीच्या कण्या असल्याचे आढळून आले.

News18लोकमत
News18लोकमत

काही वेळातच त्याची माहिती रुग्णालयात वेगाने पसरली. यानंतर प्रसूती वॉर्डमध्ये या मुलीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मात्र, ऑपरेशनद्वारे जन्मलेल्या या चिमुरडीचा जन्मानंतर 20 मिनिटांनी मृत्यू झाला. मुलीच्या जन्मानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चिमुरडीचा मृत्यूचे दुःख आईच्या चेहऱ्यावर असले तरी सध्या प्रियाची तब्येत चांगली आहे. सध्या प्रिया वैद्यकीय देखरेखीखाली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, प्रिया पहिल्यांदा गरोदर होती. मात्र, 9 महिने पूर्ण होऊनही प्रसूती न झाल्यामुळे तिचे नातेवाईक चिंतेत होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीय आणि प्रियाच्या संमतीने ऑपरेशन करण्यात आले. महिलेची अधिक समस्या पाहून डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे मुलीला जन्म दिला. मात्र, नवजात मुलीला वाचवता आले नाही. डॉ.अनिल कुमार यांनी सांगितले की अशी प्रकरणे फार कमी आहेत. असे घडते जेव्हा गर्भाशयात एकाच अंड्यातून दोन मुले तयार होतात. या प्रक्रियेत दोघेही वेळेत वेगळे झाले तर जुळी मुले जन्माला येतात. यामध्ये काही कारणास्तव दोघे वेगळे होऊ शकले नाहीत, तर अशा मुलाचा जन्म होतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलेला मुलीच्या जन्माच्या वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या महिलेसोबतही असेच घडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात