JOIN US
मराठी बातम्या / Viral / हिरवी झाली जीभ आणि त्यावर आले काळे केस; एका चुकीचा भयानक परिणाम, तुम्हीही तेच करताय

हिरवी झाली जीभ आणि त्यावर आले काळे केस; एका चुकीचा भयानक परिणाम, तुम्हीही तेच करताय

व्यक्तीची हिरवी, केसाळ जीभ पाहून डॉक्टरही शॉक झाले.

जाहिरात

हिरव्या जिभेवर आले केस.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 12 जुलै : सामान्यपणे जिभेचा रंग गुलाबी असतो. काही कारणांमुळे काही वेळा त्यावर पांढरा किंवा काही वेळा पिवळसर दिसतो. पण तुम्ही कधी जिभेचा रंग हिरवा झाल्याचं पाहिलं आहे का? काही खाल्ल्यानंतर तात्पुरता जिभेचा रंग बदलणं वेगळं, पण असं प्रकरण ज्यात जीभ हिरव्या रंगाची झाली आणि त्यावर काळे केसही आले. हे प्रकरण पाहून डॉक्टरही शॉक झाले. अमेरिकेतील हे अजब प्रकरण आहे. ओहायोमध्ये राहणाऱ्या 64 वर्षांच्या व्यक्तीच्या जिभेचा रंग हिरवा झाला. त्यानंतर तिच्या जिभेवर काळे केस आले. आता हे कसं झालं, तर यासाठी कारणीभूत आहे, ती या व्यक्तीची चूक. या व्यक्तीने जी चूक केली आहे, ती बरेच लोक करतात. कदाचित तुम्हीही ती करत असाल. अमेरिकन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसीनमध्ये या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांनी सांगितलं, की त्याच्या जिभेच्या त्वचेच्या पेशींवर एक असामान्य लेप आला. तो एक लहान आणि शंकूच्या आकाराचा फुगासारखा दिसत होता. स्क्रॅच केल्यास साधारण एक इंच लांब केस बाहेर आले. जर यावर उपचार केले नाहीत तर ते बॅक्टेरिया, अन्न आणि यीस्टसारखे इतर पदार्थ अडकवू शकतात, जे गंभीर आजारांचं कारण बनू शकतात. Shocking! माणूस चावला, श्वान रुग्णालयात; मुक्या जीवाची भयानक अवस्था फोटोत तुम्ही पाहू शकता की त्या माणसाची जीभ हिरवी झाली आहे आणि केसांसारख्या पट्ट्यांनी देखील झाकलेली आहे. बहुतेक वेळा, अशी समस्या स्वच्छतेच्या अभावामुळे उद्भवते आणि सामान्यतः 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर याचा परिणाम होतो. जे लोक धूम्रपान करतात त्यांच्या जिभेवर बॅक्टेरिया आणि पट्टिका तयार होतात. ही व्यक्ती सिगारेट ओढायची आणि सतत अँटिबायोटिक्स क्लिंडामायसिन घ्यायची. हिरड्याच्या संसर्गामुळे तो प्रतिजैविक घेत होता. प्रतिजैविक तोंडाच्या सूक्ष्मजीव संतुलनात व्यत्यय आणू शकतात, कारण ते जीवाणूंची संख्या आणि प्रकार बदलतात.  प्रतिजैविकांच्या प्रतिक्रियेमुळे जीभ तपकिरी, पांढरा, हिरवा किंवा गुलाबी कोणत्याही रंगाची असू शकते. ती व्यक्ती माउथवॉश खाते की कँडी यावर अवलंबून असते. Viral Video : तरुणाच्या अंगात शिरले किडे, समुद्र किनारी मस्ती जीवावर बेतली अहवालानुसार, जर एखाद्याच्या जीभ अशी झाली तर त्याला सामान्य वेदना किंवा जळजळ होऊ शकते. इतर कोणत्याही प्रकारची समस्या नाही. काहीजण ते स्वच्छही करतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार,  डॉक्टरांनी उपचार केले आणि तो बरा झाला. या व्यक्तीला दिवसातून चार वेळा टूथब्रशने हळूवारपणे स्वच्छ करण्यास सांगितलं. तसंच सिगारेट न पिण्याचा सल्ला देण्यात आला. सुमारे 6 महिन्यांनंतर, त्याची ही समस्या पूर्णपणे कमी झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या