JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर खाल्ल्या जगातील सर्वात तिखट मिरच्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

VIDEO: व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर खाल्ल्या जगातील सर्वात तिखट मिरच्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

कॅरोलिना रीपर मिरची ही जगातील सर्वात तिखट मिरची मानली जाते. ग्रेगरी फॉस्टर नावाच्या व्यक्तीने सॅन डिएगो डाउनटाउनमधील सीपोर्ट शॉपिंग सेंटरमध्ये तीन कॅरोलिना रीपर मिरची सर्वात जलद खाऊन विक्रम केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 31 मे : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या (Guinness World Records) इंस्टाग्राम पेजवरुन नियमितपणे थ्रोबॅक व्हिडिओ आणि फोटो केले जातात. यात अनेक थक्क करणारे विश्वविक्रम पाहायला मिळतात . अलीकडेच, GWR ने कॅलिफोर्नियातील एका माणसाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने 8.72 सेकंदात 3 कॅरोलिना रीपर मिरची खाऊन नवा विक्रम बनवला (Man Eats World’s Hottest Chili). OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स कॅरोलिना रीपर मिरची ही जगातील सर्वात तिखट मिरची मानली जाते. ग्रेगरी फॉस्टर नावाच्या व्यक्तीने सॅन डिएगो डाउनटाउनमधील सीपोर्ट शॉपिंग सेंटरमध्ये तीन कॅरोलिना रीपर मिरची सर्वात जलद खाऊन विक्रम केला. ग्रेगरीला मसालेदार अन्न खायला आवडतं, त्यामुळे त्याने असं करण्याचा विचार केला. या पराक्रमासह त्याने माईक जॅकचा 9.72 सेकंदाचा पूर्वीचा सर्वोत्कृष्ट विक्रम मोडीत काढला.

संबंधित बातम्या

विशेष म्हणजे तो दुसऱ्या प्रयत्नात हा विक्रम नोंदवण्यात यशस्वी ठरला. त्याच्या पहिल्या प्रयत्नात, त्याने सहा अतितिखट मिरच्या खाल्ल्या, पण त्याला अपात्र ठरवण्यात आलं कारण त्याच्या तोंडात मिरची शिल्लक होती, जी त्याने व्यवस्थित गिळली नव्हती. व्हिडिओमध्ये तो एकापाठोपाठ अशाप्रकारे मिरची खात आहे, जणू काही त्याच्या समोर कँडी आहेत. ग्रेगरीने सर्वात कमी वेळेत सर्व मिरच्या खाल्ल्याबरोबर त्यानं आपलं तोंड उघडलं आणि आवाज केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्रामवर त्याच्या प्रयत्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं, ‘तीन कॅरोलिना रीपर मिरची खाण्याची सर्वात जलद वेळ - ग्रेगरी फॉस्टर (यूएस) 8.72 सेकंदात.’ PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला GWR ने दुसऱ्या कमेंटमध्ये सांगितलं की, ‘यूएसए, दक्षिण कॅरोलिना येथील विन्थ्रॉप विद्यापीठाने केलेल्या चाचण्यांनुसार कॅरोलिना रीपर काली मिरची ही सर्वात तिखट मिरची आहे. या मिरचीची सरासरी 1,641,183 Scoville Heat Units (SHU) आहे, हा स्वतःच एक विक्रम आहे. एक जलपीनो काळी मिरची सुमारे 2,500-8,000 SHU असते.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या