नवी दिल्ली 06 मार्च : भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाते. मात्र ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. धावत्या ट्रेनमध्ये चढणं किंवा उतरणं अनेकदा जीवघेणं ठरतं. सध्या सोशल मीडियावर अशी प्रकरणं समोर येतात, ज्यामध्ये लोक चालत्या ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना अपघाताला बळी पडलेले दिसतात. वडिलांनी फोन हिसकावून घेतल्यानं 17 व्या मजल्याहून उडी मारण्याचं नाटक, इतक्यात हात सुटला अन्.., Shocking Video असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पाहायला मिळाला. ज्यामध्ये एक महिला आपल्या मुलासह धावत्या ट्रेनमधून खाली उतरताना प्लॅटफॉर्मवर पडली. हे पाहून युजर्सचा श्वास रोखला गेला. मात्र प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या जीआरपी जवानाच्या तत्परतेमुळे ही महिला आणि तिचे बाळ कोणत्याही मोठ्या अपघातातून बचावले, ही दिलासादायक बाब आहे.
या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर समोर आलं असून, त्यात एक महिला कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान ती आणि तिचा मुलगा दोघंही प्लॅटफॉर्मवर येताच पडले. दरम्यान, जवळच उभा असलेले GRP हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र तत्परता दाखवून महिलेला आणि तिच्या मुलाला वाचवतात. ज्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.
यूपी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला 22 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, मोठ्या संख्येने वापरकर्ते हेड कॉन्स्टेबल शैलेंद्रच्या धैर्याचं कौतुक कमेंट आणि सलाम करत आहेत. हेड कॉन्स्टेबलच्या धाडसाचं कौतुक करताना एका यूजरनं लिहिलं की, ‘हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र जी यांना बक्षीस मिळायला हवं, त्यांनी या महिलेचे प्राण वाचवले.’