प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली 11 जून : स्वतःच्या लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. प्रत्येकासाठी लग्नाचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा असतो. आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. लोक कित्येक वर्ष आपल्या लग्नाबद्दल प्लॅनिंग करत असतात. लग्नाचे ठिकाण, लग्नाचं जेवण, कपडे, सर्वकाही चांगलं असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही लोक लग्नातही आपला आळस सोडत नाहीत. 2 तरुणींच्या प्रेमात पडला तरुण; लग्नाआधीच झाला दोन मुलांचा बाप, अखेर घेतला मोठा निर्णय याचीच झलक दाखवणारा एक व्हिडिओ (Lazy Groom Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, भाऊ..आज तरी आळस सोडा आणि लग्नावर लक्ष केंद्रित कर. हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Funny Wedding Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे आणि लोकांना खळखळून हसण्यास भाग पाडत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे. लग्नसोहळा सुरू असताना वधू-वर मंडपात हवन करत बसलेले आहेत. निश्चितच आपल्या लग्नाच्या हा खास क्षणी कोणीही अतिशय उत्साहात आणि आनंदात असेल. मात्र या व्हिडिओमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळतं. इथे बसलेला नवरदेव असं काही करताना दिसतो, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. यात नवरदेव आळस आणि जांभई देताना दिसतो. VIDEO: लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीला उचलून जमिनीवर आपटलं; नवरदेवाचं कृत्य पाहून सगळेच हैराण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, नवरदेव अतिशय थकलेला आहे आणि लग्नाच्या दिवशीही त्याचा आळशीपणा संपत नाहीये. वराकडे पाहून असं वाटतं की लग्नाआधी त्याला एक पलंग आणि ब्लँकेटची गरज आहे, जेणेकरून तो त्याची झोप पूर्ण करू शकेल. नवरदेवाचं हे कृत्य पाहून सोशल मीडियावर हशा पिकला आहे आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर weddingwearguides नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर 4 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे, आळशी नवरदेव. तर एकाने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, हा नक्कीच बँकेत काम करत असेल.