JOIN US
मराठी बातम्या / Viral / हनिमून साजरा करताच नवरदेव गायब, नववधूला जेव्हा कळलं तेव्हा...

हनिमून साजरा करताच नवरदेव गायब, नववधूला जेव्हा कळलं तेव्हा...

मोबाईल आणि पर्समुळे त्याच्या अशा वागण्याचे गूढ वाढले..!

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 फेब्रुवारी : लग्न हा प्रत्येक तरुण-तरुणीसाठी महत्वाचा क्षण असतो, या काळात दोघांच्याही आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. नवीन नाती, नवीन लोक, नवीन गोष्टी आणि जबाबदारी या सगळ्या गोष्टी देखील लग्नानंतर येतात, त्यामुळे एका मुलीसाठी हा कठीण काळ देखील असतो, कारण तिला सगळ्या नवीन गोष्टींना आपलंस करायचं असतं, पण ती यासगळ्यात खुश देखील असते कारण तिला तिच्या हक्काचा माणूस मिळणार असतो. पण विचार करा की लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतरच एका नववधूला नवरदेव सोडू गेला तर? तिची काय परिस्थीती होत असेल? हे ही पाहा : सुहागरातच्या रात्री कॅमेरा चालू ठेवून कपलनं केलं असं काम, Video सोशल मीडियावर होऊ लागला Trend असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये हनिमूनच्या रात्रीनंतर नवरदेव गायब झाला, याबद्दल माहिती मिळताच नववधू आणि तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे नवरदेव आपला मोबाईल आणि पर्सही घरीच सोडून गेला आहे. अशा स्थितीत तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या अशा वागण्याचे गूढ अधिकच वाढले आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आहे. येथे एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या लहान भावाच्या तक्रारीवरून तपास झाला. फिर्यादीने सांगितले की, 18 फेब्रुवारी रोजी त्याच्या भावाचे लग्न झाले होते. दुसऱ्या दिवशी पारंपरिक रितीरिवाजानुसार वधूचे घरी स्वागत करण्यात आले. वरानेही सर्व विधींमध्ये आनंदाने भाग घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक तो घरातून बेपत्ता झाला. हे ही पाहा : आधी एकमेकांना Kiss आणि मग कपडे काढत… ट्रेनमध्ये कपलचं अश्लील कृत्य कॅमेरात कैद मोबाईल आणि पर्समुळे त्याच्या अशा वागण्याचे गूढ वाढले..! नवरदेव बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. सर्व नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला, पण त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. शिवाय नवरदेव पळून गेला असं म्हणावं तर, मग तो आपलं पाकिट, मोबाईल आणि पैसे सोडून का पळेल? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. मग अशा स्थितीत नवरदेव गायब झालाय, की त्याला गायब करण्यात आलं आहे? असा प्रश्न पोलिसांनी उपस्थीत केला. वधूची अवस्था वाईट आहे माहेरचे घर सोडून सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवल्यानंतर अवघ्या एका दिवसात नवरीची सर्व स्वप्न एकाक्षणात संपल्याची ही भावना वधूला शांत राहू देत नाहीय, नववधूला या सगळ्यामुळे धक्काच बसला आहे. ज्याने सात जन्म साथ राहण्याचे आश्वासन दिले, तो एका दिवसातच सोडून गेला होता. त्यामुळे गोंधळलेली नववधू आपल्या पतीला शोधून आणण्यासाठी नातेवाईक आणि पोलिसांकडे विनवणी करत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक दुर्गेश सिंह यांनी सांगितले की, हरवलेल्या वराचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सर्व संभाव्य ठिकाणी तपास करत आहे. याशिवाय कुटुंबीयांना बोलवून त्यांनी आखलेला हा कट तर नाही ना? याबद्दल देखील पोलीस तपास घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या