JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मंडप सोडून थेट पोलीस ठाणं गाठलं; नवरीविरोधातच केली तक्रार, प्रकरण काय?

लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मंडप सोडून थेट पोलीस ठाणं गाठलं; नवरीविरोधातच केली तक्रार, प्रकरण काय?

4 जून रोजी त्यांनी लग्नाची तयारी पूर्ण केली आणि 11 जून रोजी कुटुंबातील काही सदस्य पूजाच्या घरी गेले आणि तिला 10,000 रुपये आणि कपडे दिले.

जाहिरात

नवरदेवाची नवरीविरोधात तक्रार (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 01 जुलै : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिलस असतो. मात्र, एका नवरदेवाला त्याच्या लग्नाच्या दिवशीच मोठा धक्का बसला. जेव्हा त्याला कळालं की वधू बेपत्ता आहे आणि तिच्या घराला कुलूप आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथून ही घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरदेवाची त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून खंडवाच्या बसंत नगरमध्ये पूजा नावाच्या मुलीशी भेट झाली होती. 2 जून रोजी आपल्या कुटुंबासह तिच्या घरी गेल्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काय सांगता! या गावात माशा होऊ देईना तरुणांचं लग्न; कहाणी वाचून थक्क व्हाल 4 जून रोजी त्यांनी लग्नाची तयारी पूर्ण केली आणि 11 जून रोजी कुटुंबातील काही सदस्य पूजाच्या घरी गेले आणि तिला 10,000 रुपये आणि कपडे दिले. 23 जून लग्नाची तारीख ठरली होती. मात्र, शुक्रवारी नवरदेव वरात घेऊन खांडव्यात पोहोचल्यावर मुलीच्या घराला कुलूप असल्याचं समजलं. नंतर नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून समजलं की, मुलगी आणि तिचे वडील दोन दिवसांपूर्वी घर सोडून इतरत्र गेले होते. घराच्या मालकाने पूजाच्या वडिलांचं ओळखपत्र दिलं, ज्यामध्ये तिच्या वडिलांचं नावही वेगळंच असल्याचं नवरदेवाला समजलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर नवरदेव आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी रामेश्वर पोलीस चौकी गाठली. इथे त्यांनी फरार वधू आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेमुळे नवरदेवाला मोठा धक्का बसला. नवरदेवाकडील लोकांनी या लग्नावर 70 हजाराहून अधिक रुपये खर्च केले होते.तर, कपडे खरेदीसाठी 10,000 रुपये खर्च केले. पोलीस चौकीचे प्रभारी रणवीर सिंग सोलंकी यांनी सांगितलं की, ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. वराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या