नवरीच्या आईच्या डान्समुळे मोडलं लग्न (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ 05 जुलै : आई-वडील आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची अतिशय आतुरतेनं वाट पाहात असतात. त्यामुळे या लग्नात ते पूर्ण आनंद लुटतात. पण तेच सेलिब्रेशन लग्न मोडण्याचं कारण ठरलं तर? उत्तर प्रदेशच्या संभलमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल. यात मुलीच्या लग्नात आईने एवढा डान्स केला की, नवरदेवाने थेट लग्नच मोडलं. या गोष्टीवरुन मोठा वाद झाला आणि या वादानंतर लग्न मोडलं. वधूच्या आईवर दारू पिऊन आणि सिगारेट ओढून डान्स केल्याचा आरोपही करण्यात आला होता. यामुळे नवरदेवाने लग्नाला नकार दिला. हे प्रकरण हयातनगर पोलीस ठाण्याच्या सरायतरीन गावाशी संबंधित आहे. इथल्या एका मुलाचं लग्न ठरलं होतं. सरायतरीनमध्येच हा विवाह सोहळा पार पडणार होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीकडचे लोक नवरीला घेऊन सरायतरीन गावात आले होते, जिथे वधूची आई डीजेवर मस्त नाचली. लग्नातच जोडप्याने केलं असं काही की झाले तुफान व्हायरल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले ‘36 गुण जुळले’ नवरीच्या आईचा हा डान्स पाहून लग्नात काही लोक टाळ्या वाजवत होते. मात्र, कुटुंबातील एका महिलेने वधूच्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला. पण डान्स करण्यात तल्लीन झालेली नवरीची आई डीजेवर मस्त नाचत राहिली. हे पाहून वराच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला. नवरदेवाकडील लोकांचा आरोप आहे, की वधूच्या आईने दारू पिऊन संपूर्ण वरातीत डान्स केला. तिने सिगरेटही प्यायली. हे सर्व पाहून वराने लग्नास नकार दिला. यामुळे वधूची आई लग्नाशिवायच नातेवाईकांना घेऊन घरी परतली. डान्समुळे लग्न मोडल्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.