JOIN US
मराठी बातम्या / Viral / Google Tricks: गुगलची ही सिक्रेट ट्रिक माहीत आहे का? जाणून व्हाल चकित

Google Tricks: गुगलची ही सिक्रेट ट्रिक माहीत आहे का? जाणून व्हाल चकित

आज आम्ही तुम्हाला गूगलच्या पाच खास ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. या ट्रिक जाणून घेऊन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै : गूगल सर्च इंजिन जगातील सर्वोत्कृष्ट सर्च इंजिन मानलं जातं. भारतासह संपूर्ण जगभरात ते वापरलं जातं. गुगल हा माहितीचा विशाल महासागर आहे. यातील काही गोष्टींविषयी आपण परिचित आहोत, तर काही आपल्या कल्पनेपलीकडच्या आहे. आज आम्ही तुम्हाला गूगलच्या पाच खास ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. या ट्रिक जाणून घेऊन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल… एखादी व्यक्ती इंटरनेटशिवाय वेळ कसा घालवू शकते, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. परंतु याबद्दल तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण गुगलनं यासाठी एक खास मार्ग शोधला आहे. जेव्हा तुम्हाला इंटरनेट कनेक्शन नसेल, तेव्हा तुम्ही ऑफलाइन डायनासोर गेम खेळू शकता. हा खेळ तुम्हाला तुमच्या ब्राउजर पेजवर खेळता येऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल, तेव्हा ही गेम खेळण्यासाठी तुम्हाला फक्त त्या पेजवर क्लिक करावं लागेल. सर्च बारमध्ये “Askew” टाइप करा, एंटर दाबा आणि तुमचे पेज एका बाजूला टिल्ट होईल. पण चिंता करू नका, स्क्रीनमध्ये कोणतीही समस्या नाही. ते फक्त झुकलेलं असेल तुम्ही नवीन पेज ओपन केलंतर ते निघून देखील जाईल. तुमच्या वेब ब्राउजरमध्ये “Google Orbit” टाइप करा आणि सर्च वर क्लिक करा. आपले शोध प्रथम परिणाम मध्ये “Google Sphere - Mr. Doob” टिप्पणी. यावर क्लिक करा तुमच्या होम पेजवर एक गोलाकार स्थिती येईल, तुम्ही माऊसला फिरवून पृथ्वीच्या आसपास फिरवू शकता. हे तुम्हाला एक इंटरेक्टिव्ह अनुभव प्रदान करते. जर तुमच्याकडे नाणं नसेल आणि तुम्हाला टॉस उडवायचा असेल. तर तुम्ही Google ची मदत घेऊ शकता. “फ्लिप कॉइन” लिहा आणि एंटर दाबा. एक नाणं येईल त्यावर क्लिक केल्यावर हेड्स आणि टेल्स येईल. जेव्हा तुम्ही लुडो किंवा सापशिडी खेळता तेव्हा गरजेचा अशतो तो फासा, पण तो तुमच्याकडे नसेल तर काळजी करु नका तुम्ही यासाठी गुगलची मदत घेऊ शकता. Google तुम्हाला डायस देखील रोल करण्याचा पर्याय देतो. बस “रोल अ डाइस” टाइप करा आणि तुम्हाला एक वर्चुअल डाइस मिळेल. ज्यावर तुम्ही क्लिक केल्यावर ते फासं किंवा डाइस काम करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या