JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: बकरीसमोर उभा राहून बनवत होती रील; पुढच्याच क्षणी तरुणीसोबत नको ते झालं

Viral Video: बकरीसमोर उभा राहून बनवत होती रील; पुढच्याच क्षणी तरुणीसोबत नको ते झालं

तरुणी एका बकरीसमोर व्हिडिओ बनवत होती. पण तेवढ्यात बकरी घाबरली आणि जे झालं ते बघून तुमचं हसू थांबणार नाही.

जाहिरात

बकरीचा तरुणीवर हल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 22 जून : आजकाल तरुणांमध्ये रील्स बनवण्याची आणि सेल्फी व्हिडिओ शूट करण्याची तसंच ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची क्रेझ वाढत आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनोख्या पद्धतीने सेल्फी व्हिडिओ अपलोड करत असतात. काही लोक थेट लाइव्ह जातात. पण एका मुलीला असाच एक व्हिडिओ शूट करणं चांगलंच महागात पडलं. झालं असं की, तरुणी एका बकरीसमोर व्हिडिओ बनवत होती. पण तेवढ्यात बकरी घाबरली आणि जे झालं ते बघून तुमचं हसू थांबणार नाही. पण सोबतच तुम्हाला या तरुणीसाठी वाईटही वाटेल. व्हायरल क्लिपमध्ये एक तरुणी दोरीने बांधलेल्या बकरीसमोर सेल्फी व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी ही तरुणी वेगवेगळे एक्सप्रेशन देऊ लागते. व्हिडिओमध्ये ती तरुणी कधी हसताना तर कधी पाउट करताना दिसत आहे. यादरम्यान बकरी कधी कॅमेऱ्याजवळ जाताना तर कधी मागे जाताना दिसत आहे. पण बकरीला हे सर्व अजिबात आवडले नाही असे दिसते. पुढच्याच क्षणी तिने मुलीच्या डोक्यावर आपली शिंगे मारली. Viral Video: हे काय! आधी ग्लासातून स्वतःच दारू प्यायली; मग नशेत माकडाने काय केलं पाहा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @mazak.he नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने आ बकरी मुझे मार, असे कॅप्शन दिले आहे. यासोबत लिहिलं आहे की, त्याने काय अप्रतिम हेडशॉट मारला आहे. 11 जून रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केलं आहे, तर अनेक वापरकर्त्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

दीदी स्वत:ला डिस्ने प्रिन्सेस समजत होती, अशी कमेंट एका यूजरने केली आहे. दुसरीकडे, दुसरा वापरकर्ता म्हणतो, जणू काही बकरी म्हणत आहे- तुम्ही न विचारता सेल्फी कसा काढला. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, मी दावा करू शकतो की मुलीची स्मरणशक्ती गेली असावी. यासोबतच लोकांना सेल्फी घेताना काळजी घेण्याचे आवाहनही केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या