JOIN US
मराठी बातम्या / Viral / लाथा मारल्या, झिंज्या उपटल्या! भररस्त्यातच तरुणींचं 'ढिशूम ढिशूम'; Fighting video viral

लाथा मारल्या, झिंज्या उपटल्या! भररस्त्यातच तरुणींचं 'ढिशूम ढिशूम'; Fighting video viral

तरुणींच्या फ्री-स्टाईल हाणामारी (Girl’s fighting video) व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै : तरुणी असो किंवा महिला तशी त्यांची भांडणं (Woman’s fighting) काही नवीन नाहीत. त्या एकदा भांडायला लागल्या की कुणाचंच ऐकत नाही. अगदी पुरुषांप्रमाणे हाणामारीवरसुद्धा उतरतात. सध्या अशाच तरुणींच्या फायटिंगचा (Girl’s fighting) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. या तरुणींनी भररस्त्याचं फ्री-स्टाईल हाणामारी (Girl’s fighting video) केली आहे. रस्त्यातच तरुणींमध्ये दंगल रंगली. रस्त्यावर बोलता बोलता अचानक दोन तरुणी आधी भांडू लागल्या आणि काही वेळातच दोघींनीही एकमेकांवर हात उचलला. फक्त हातच नाही तर अगदी एकमेकांना पायांनीही मारायला त्यांनी सुरुवात केली. लाथाबुक्के मारत त्यांच्यात जोरदार फायटिंग रंगली.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला दोन तरुणींमध्ये भांडणं होतं, तिसरी तरुणीसुद्धा तिथं आहे. दोघींमध्ये भांडण झाल्यानंतर तिसरी त्या भांडणात पडते. त्यापैकी एक तरुणी तिसरीला ढकलून देते आणि मग दोघी एकमेकींवर तुटून पडतात. तिसरी तरुणी एक फाईट देऊन लढाईतून पळ काढते. मग दोन तरुणीच एकमेकांशी लढताना दिसतात. हे वाचा -  VIDEO - एक फ्लिप आणि गटारातच झाला आडवा; स्टाइल मारता मारता तरुण तोंडावर पडला हातांपासून सुरू झालेली लढाई पायांपर्यंत पोहोचते.  अगदी एखाद्या फिल्मी सीनमध्ये फायटिंग होते तशाच या तरुणी आपसात भिडल्या. दोघीही एकापेक्षा एक वरचढ. दोघींपैकी एकही माघार घ्यायला तयार नाही. एक तरुणी तर अशी फायटिंग करते आहे, जणू तिनं मार्शल आर्टचं ट्रेनिंगच घेतलं आहे.  आजूबाजूचे लोकही त्यांना पाहून घाबरतात. नेमकं या तरुणींचं झालं तरी काय? त्या ्शी फायटिंग का करत आहेत? असा प्रश्न त्यांनाही पडला. हे वाचा -  लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; बकाबक खाताना VIDEO सतु सैनी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या