JOIN US
मराठी बातम्या / Viral / फक्त पिझ्झा खायला ज्वालामुखीवर पोहोचली मुलगी, Video पाहून डोक्याला लावाल हात

फक्त पिझ्झा खायला ज्वालामुखीवर पोहोचली मुलगी, Video पाहून डोक्याला लावाल हात

अनेक लोक खाण्याचे चाहते असतात. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ट्राय करणं लोकांना आवडतं. असे फूडी आणि त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात.

जाहिरात

ज्वालामुखीवर भाजला पिज्जा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जुलै : अनेक लोक खाण्याचे चाहते असतात. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ट्राय करणं लोकांना आवडतं. असे फूडी आणि त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. खाण्यासाठी लोक काहीही करतात हे तुम्ही ऐकलंच असेल मात्र एका मुलीनं चक्क पिझ्झा खाण्यासाठी धोका पत्करला आहे. तिचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका मुलीचा पिझ्झा खाताना व्हिडीओ समोर आलाय. आश्चर्याची बाब म्हणजे या मुलीनं पिझ्झा ज्वालामुखीच्या धगधगत्या लाव्हामध्ये पिझ्झा शिजवला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मुलीनं चक्क ज्वालामुखीच्या आगीमध्ये पिझ्झा भाजला. यानंतर ती मस्त वाऱ्याच्या आनंदात तो पिझ्झा खातानाही दिसली. हे दृश्य ग्वाटेमालामधील ज्वालामुखीचं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. याठिकाणी अनेक जीव धोक्यात घालून पिझ्झा खाण्यासाठी येतात.

संबंधित बातम्या

अलेक्झांड्रा नावाच्या फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ग्वाटेमालाला या एक्टिव्ह वॉल्कैनोवर शिजवलेला पिझ्झा खाल्ला. इथे येताना नॅशनल पार्कचा गाईड सोबत ठेवा आणि इथे वाऱ्यामुळे थंडी पडते त्यामुळे जॅकेट सोबत ठेवा. हा व्हिडिओ 14 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 76 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या