नवी दिल्ली 18 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा अशा काही गोष्टी व्हायरल (Viral) होतात ज्या तुमचा दिवसच खास बनवतात. तर काही वेळा अगदी विचित्र घटनाही (Weird Incidents) तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सध्या इंटरनेटवर एक वेगळाच फोटो व्हायरल (Viral Photo) होत आहे. कोरोनामुळे (Corona) मागील बऱ्याच काळापासून ऑनलाईन क्लासेस (Online Classes) आणि काम सुरू आहे. अशात अनेक लोक याचा फायदा घेत आहेत. हद्दच झाली! विमानातच कपलचे अश्लील चाळे; प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ ऑनलाईन अभ्यास भलेही अनेकांसाठी आरामदायक असला तरीही अनेकजण याचा चुकीचा फायदाही घेत आहेत. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. यात एका मुलीनं ऑनलाईन क्लासच्या वेळी लॅपटॉपच्या समोर एक डमी ठेवल्याचं दिसलं आणि ती स्वतः बेडवर जाऊन झोपते. क्लास बोरिंग झाल्यावर तसंही विद्यार्थ्यांना झोप येऊ लागते. अशात या विद्यार्थीनीनं ऑनलाईन क्लासचा फायदा घेत कॅमेऱ्याच्या समोर एक डमी ठेवून आरामात झोप घेतली.
पतीपासून बचावासाठी खिडकीतून उडी घेताना दिसली गरोदर महिला; व्हायरल होतोय Photo सध्या या घटनेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मुलगी एका बेडवर झोपलेली दिसत आहे. टेबलवर तिनं एक लॅपटॉप ठेवला आहे. या लॅपटॉपच्या समोर एक डॉल ठेवून तिनं त्याला चश्मा लावला होता. इतकंच नाही तर कोरोनाच्या नियमांनुसार, या डॉलला मास्कही लावलं होतं. काही ट्विटर यूजर्सनं या मुलीची मस्करी केली आहे. एका यूजरनं लिहिलं, की घरातून क्लास अटेंड करताना मास्कची काय गरज आहे. या फोटोला आतापर्यंत 524.1K लाईक्स, 62.1K हून अधिक रिट्विट आणि 7392 हून अधिक कमेंट मिळाल्या आहेत.