JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे! हे काय? पाण्यात उडी मारताच पूर्ण वेगळे झाले डोक्यावरचे केस; पाहा मजेशीर VIDEO

अरे! हे काय? पाण्यात उडी मारताच पूर्ण वेगळे झाले डोक्यावरचे केस; पाहा मजेशीर VIDEO

तरुणीची चांगलीच फजिती झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 सप्टेंबर : पोहोता (Swimming) येत नसल्यास स्विमिंग पूलमध्ये (Swimming pool) गटांगळ्या घेणं, स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावरून अचानक पाय घसरून पाण्यात पडणं किंवा उंचावरील डाइव्हिंग बोर्डवरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना भीती वाटणं, असे स्विमिंग पूलवरील बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्हाला हसूही आवरणार नाही. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना तरुणीसोबत असं काही घडलं की ज्याचा आपण कधीही विचार कलेला नसेल. तरुणीने पाण्यात उडी मारली आणि तिचे डोक्यावरील संपूर्ण केस हवेत उडत वेगळेच झाले (Woman hair fall). व्हिडीओ पाहताच काही वेळ हे काय घडलं, काय झालं तेच समजत नाही.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता, एक तरुणी डाइव्हिंग बोर्डवर उभी आहे. ती स्विमिंग पूलच्या पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत आहे. ती फ्लिप करत पाण्यात उडी मारते. जेव्हा ती फ्लिप मारत पाण्यात जाते, तेव्हा तिचे डोक्यावरील केस पूर्णपणे वेगळे होतात. तरुणी पाण्यात आणि तिचे केस हवेत उडत डायव्हिंग बोर्डवर परतात. हे वाचा  -  मासे पकडायला गेला पण माशानेच पाण्यात खेचून घेतलं आणि…; धडकी भरवणारा VIDEO साहजिकच हे तरुणीचे खरे केस नाहीत तर हे खोटे केस आहेत. त्यामुळे तरुणीचं डोकं जेव्हा खाली झालं तेव्हा केसांचा हा विग पूर्णपणे निघाला आणि तो वेगळा झाला. पण पाहताना तरुणीचे खरे केसच पूर्ण निघाले असं वाटतं. तिच्या मित्रांनी हे मजेशीर दृश्यं कॅमेऱ्यात कैद केलं. हे वाचा  -  VIDEO: पुलावरुन नदीत उडी घेत होता युवक; अचानक असं काही घडलं जे पाहून बसेल धक्का होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या तरुणीला आपले केस ओले करायचे नव्हते, असं कॅप्शन या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. पण त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.  केसांना माहिती होतं की पुढे काय होणार आहे, म्हणून आधीच त्यांनी स्वतःला वाचवलं अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या