मेट्रोत तरुणीने असं काही केलं की सर्वजण शॉक.
नवी दिल्ली, 08 जून : गेले काही दिवस मेट्रो ट्रेन चर्चेतच आहेत. मेट्रोतील प्रवाशी काही ना काही विचित्र करताना दिसतात. कधी कुणी नको तसे कपडे घालतं, तर कधी कुणी अश्लील चाळे करताना दिसतं. आता पुन्हा एकदा मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यात एक तरुणी मेट्रोत पुरुषांच्या गर्दीत असं काही करू लागली की सर्वांनाच धक्का बसला आहे. मेट्रोतून प्रवास करणारी ही तरुणी. जिच्या आजूबाजूला सर्व पुरुष प्रवाशीच दिसत आहेत. त्यांच्या मध्ये राहून ही तरुणी अचानक असं काही करू लागते की त्या प्रवाशांनाही शॉक बसतो. तेसुद्धा तिच्याकडे पाहतच राहतात. तरुणीसोबत असलेल्याने तरुणीचा हा व्हिडीओ शूट केला आहे. सोशल मीडियावर तो पोस्ट करताच तुफान व्हायरल होतो आहे. एक नंबर आजी! ब्रेकअप झालेल्या नातीला दिला लय भारी सल्ला; VIRAL VIDEO एकदा पाहाच व्हिडीओत तुम्ही पाहू सकता काळ्या रंगाचा टॉप आणि पँट घातलेली ही तरुणी. तिच्या आजूबाजूला पुरुष आहेत. तिच्या समोर सीटवर एक व्यक्ती बसली आहे. तिच्या मागे एक वयस्कर व्यक्ती आहे. तर तिच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती उभी आहे. हे तिन्ही लोक तिच्या अगदी जवळ आहेत. तरुणी सुरुवातीला शांत उभी आहे पण अचानक ती असं काही करू लागते की सर्वच थक्क होतात. तरुणी अचानक डान्स करू लागते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तिच्या दोन्ही बाजूला असलेले प्रवाशी तर तिच्याकडे कुतूहलाने पाहत आहेत. तिच्या डान्सचा आनंद घेत आहे. पण तिच्या मागे असलेल्या व्यक्तीला मात्र तरुणीचं असं कृत्य पाहून मोठा झटका बसल्याचं दिसतं आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. Wedding Video Viral : वरात दारात येताच उत्साही नवरी धावत बाल्कनीत गेली; पुढे असं काही घडलं की… परी शर्मा नावाच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
फेमस होण्यासाठी केलेल्या या व्हिडीओमुळे ही तरुणी मात्र मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.