JOIN US
मराठी बातम्या / Viral / कुस्ती पाहण्यासाठी आलेली तरुणीच आखाड्यात उतरली; पैलवानांची केली जबर धुलाई, Video Viral

कुस्ती पाहण्यासाठी आलेली तरुणीच आखाड्यात उतरली; पैलवानांची केली जबर धुलाई, Video Viral

या व्हिडिओमध्ये दोन महिला कुस्तीपटू रिंगमध्ये कुस्ती खेळताना दिसत आहेत. रिंगच्या बाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, प्रेक्षकांमधून बाहेर पडून एक तरुणी रिंगमध्ये पोहोचते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 एप्रिल : कुस्तीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आणि शेअर केले जातात. कुस्तीचा व्हिडिओ अपलोड होताच लोक याला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवतात. तरुणांना कुस्तीचे व्हिडिओ भरपूर आवडतात. नेटकऱ्यांना WWE पासून ते अगदी स्थानिक स्तरापर्यंतची कुस्ती पाहायला आवडते. सध्या सोशल मीडियावर कुस्तीचा असाच एक व्हिडिओ (Wrestling Video) व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये जे काही घडतं ते खूपच अजब आहे (Girls Fight Video). दिखाव्याच्या नादात तरुणासोबत भलतंच घडलं; BMW मधून पडून थेट रस्त्यावर आपटला, पाहा VIDEO या व्हिडिओमध्ये दोन महिला कुस्तीपटू रिंगमध्ये कुस्ती खेळताना दिसत आहेत. रिंगच्या बाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, प्रेक्षकांमधून बाहेर पडून एक तरुणी रिंगमध्ये पोहोचते. हे पाहून बाकी प्रेक्षकांसोबत रेफ्रीही हैराण झाले. ती तरुणी रिंगमध्ये पोहोचते आणि असं काही करते जे पाहून लोकांचा विश्वास बसत नाही. आपण पाहू शकता की मुलगी रिंगमधून पोहोचल्यानंतर अगदी कहर करू लागते.

संबंधित बातम्या

‘द ग्रेट खली’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या दलीप सिंग राणा यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. द ग्रेट खली स्वतः कुस्ती अकादमी चालवतो. तो दररोज त्याच्या अकादमीतील अनेक व्हिडिओ शेअर करतो. या व्हिडिओंमध्ये कुस्तीपटू एकमेकांशी भिडताना दिसतात. मात्र, आता खलीने महिला कुस्तीपटूंचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. Girl Video: विसरभोळ्या मुलीने स्कूटीसोबत केला प्रताप; लोक मात्र म्हणाले,‘वाह दीदी वाह’! व्हिडिओमध्ये दिसतं की, प्रेक्षकांच्या मधोमध असलेली ही तरुणी रिंगमध्ये जाते आणि महिला कुस्तीपटूंना मारहाण करते. मुलीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंस्टाग्राम युजर्स यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘हे लोक किती नाटक करतात.’ 23 सेकंदांचा हा व्हिडिओ भरपूर पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या