JOIN US
मराठी बातम्या / Viral / आईचं प्रेम! स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने पिल्लाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं..पाहा VIDEO

आईचं प्रेम! स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने पिल्लाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं..पाहा VIDEO

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह जिराफाच्या पिल्लावर हल्ला करतो आणि त्याला आपली शिकार बनवण्याच्या तयारीत असतो. तो त्याचे तीक्ष्ण दात त्याच्या गळ्यात गाडून त्याला मारणार असतो, इतक्यात….

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 मार्च : जिराफ हे खूप उंच प्राणी असतात पण ते तितकेच सरळ असतात. सहसा तुम्हाला जिराफ लढतानाचा व्हिडिओ दिसणार नाही. शाकाहारी असल्याने तो शांतपणे झाडांच्या सर्वात उंच फांद्यांची पाने खातो आणि त्याचं त्याचं काम करतो. पण जेव्हा धोका आपल्या मुलावर येतो तेव्हा प्रत्येक जीवाला राग येतो. जिराफच्या बाबतीतही तेच आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दृश्य दिसत आहे. मांजरीला त्रास देणं सापाला भोवलं; शेवटी झाली अशी अवस्था की पाहून व्हाल शॉक..VIDEO आम्ही तुमच्यासाठी जंगल आणि वन्य प्राण्यांशी संबंधित आश्चर्यकारक व्हिडिओ घेऊन येत असतो. हे व्हिडिओ अनेकदा नेटकऱ्यांना थक्क करून सोडतात. आज आपण ज्या व्हिडिओबद्दल बोलणार आहोत तो एका आईचा आहे. या व्हिडिओमध्ये आपलं लहान पिल्लू संकटात असताना आई त्याच्या मदतीला धावून येते. फरक एवढाच आहे की इथे आपण जिराफाबद्दल बोलत आहोत, माणसाबद्दल नाही.

संबंधित बातम्या

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह जिराफाच्या पिल्लावर हल्ला करतो आणि त्याला आपली शिकार बनवण्याच्या तयारीत असतो. तो त्याचे तीक्ष्ण दात त्याच्या गळ्यात गाडून त्याला मारणार असतो, इतक्यात त्या जिराफाच्या पिल्लाची आई तिथे येते आणि तिच्या पिल्लाचा जीव वाचवते. मादी जिराफ येताना पाहून सिंह लगेचच तिथून पळ काढतो. भयंकर शिकारी अशा प्रकारे धावताना पाहणं खरोखरच हैराण करणारं आहे.

@animal.worlds11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बचाव करूनही सिंहाने जिराफाच्या पिल्लाची मान पकडली होती. एकाने म्हटलं की जिराफाने खूप चांगला बचाव केला आणि सिंहाला पळायला लावलं. आणखी एकाने म्हटलं, की जिराफ एका लाथेनं सिंहाला मारू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या