JOIN US
मराठी बातम्या / Viral / साथीदाराला वाचवण्यासाठी सापासोबत भिडला सरडा; VIDEO च्या शेवटी घडलं असं काही, ज्याची कल्पनाही केली नसेल

साथीदाराला वाचवण्यासाठी सापासोबत भिडला सरडा; VIDEO च्या शेवटी घडलं असं काही, ज्याची कल्पनाही केली नसेल

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सापाने सरड्याला कसं जखडून टाकलं आहे आणि तो सरड्याला खाण्याच्या तयारीत आहे. पण तेवढ्यात…

जाहिरात

सापासोबत भिडला सरडा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 09 जुलै : पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत, जे मांसाहारी आहेत आणि इतर प्राण्यांची शिकार करून ते आपलं पोट भरतात. सिंह, वाघ आणि बिबट्यासारखे प्राणी इतर वन्य प्राण्यांना आपला शिकार बनवतात आणि त्यांना मारून खातात. सापही तेच करतात. ते कीटक, बेडूक आणि सरडे यांच्यासह लहान प्राण्यांना मारतात आणि खातात. अनेकवेळा सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये साप विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, मात्र या व्हिडिओनं सगळ्यांनाच थक्क केलं. या व्हिडिओमध्ये एक साप एका मोठ्या सरड्याला (Gecko) बळी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. परंतु जेव्हा दुसरा सरडा आपल्या साथीदाराला मदत करण्यासाठी आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी सापाशी सामना करतो तेव्हा सापाचे प्रयत्न अपयशी ठरतात. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सापाने सरड्याला कसं जखडून टाकलं आहे आणि तो सरड्याला खाण्याच्या तयारीत आहे. पण तेवढ्यात दुसरा सरडा तिथे पोहोचतो. त्याला पाहताच साप त्याच्यावर हल्ला करतो, पण सरडाही खूप निडर होता.

संबंधित बातम्या

हा सरडा सापासोबतच भिडताना दिसतो. अखेर हा सरडा आपल्या साथीदाराला वाचवण्यात यशस्वी होतो. हा धक्कादायक व्हिडिओ wildlife011 नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कंबोडियातील एका मंदिरातील असल्याचं सांगितले जात आहे, जिथे भेट देण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कासवाने सापावर केला जबर हल्ला; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही हा व्हिडिओ आतापर्यंत 25 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लाईकही केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. संकटात सापडलेल्या आपल्या साथीदारांचे प्राण कसे वाचवायचे हे मानवानेही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, असं युजर्सचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या